The wife should take her husband's nose in anger when asked about the chatting | चॅटिंगबाबत जाब विचारल्याच्या रागात पत्नीने पतीच्या नाकाचा घेतला चावा
चॅटिंगबाबत जाब विचारल्याच्या रागात पत्नीने पतीच्या नाकाचा घेतला चावा

मीरा रोड : पत्नीला मित्राशी चॅटिंग का करतेस, असा प्रश्न विचारणे पतीला महागात पडले आहे. या प्रश्नावर संतापलेल्या पत्नीने पतीस शिवीगाळ करीत ठोशाबुक्क्यांनी मारहाण तर केलीच, शिवाय नाकाचा चावा घेतला.

आरोपी पत्नी कौटुंबिक वादातून माहेरी राहते. मुलीच्या स्पर्धा असल्याने पत्नीने फोन करून पतीला येण्यास सांगितले होते. तो शनिवारी सकाळी कार्यक्रमास जाऊ शकला नाही. परंतु, दुपारी तो सासरी गेला. पत्नीने कार्यक्रमाला न आल्याबद्दल जाब विचारला. त्यावरुन उभयतांमध्ये वाद आणि पत्नी रागाने बेडरूममध्ये निघून गेली. दरम्यान, त्याने तिचा लॅपटॉप पाहिला असता त्यात तिने मित्राशी चॅटिंग केल्याचे दिसून आले. तू मित्राशी चॅटिंग का करतेस, अशी विचारणा त्याने केली. त्यावर या विषयावर रात्री बोलू, असे सांगत तिने त्याला टाळले. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याने पुन्हा तिला मित्राशी चॅटिंग केल्यावरून जाब विचारला. त्यावरून कडाक्याचे भांडण सुरू झाले. संतप्त पत्नीने पतीला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्याच्या नाकास चावा घेऊन जखमी केले. भार्इंदर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार पती हा ३१ वर्षांचा असून वसई-नालासोपारा लिंक रस्त्यावर आईवडिलांसोबत राहतो. तो खाजगी बँकेत नोकरीला असून २०११ साली भाईंदर पश्चिमेच्या तरुणीशी त्याने आंतरधर्मीय प्रेमविवाह केला. परंतु, दोघांमध्ये वाद झाल्याने वसई दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे.

Web Title: The wife should take her husband's nose in anger when asked about the chatting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.