मोबाइलवरून झालेल्या वादातून महिलेने घेतले शेजाऱ्यांना चावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:10 IST2019-05-07T02:09:52+5:302019-05-07T02:10:13+5:30

पतीचा मोबाईल पत्नीने परत मागितला म्हणून संतप्त शेजारणीने पत्नीसह शेजाऱ्यांना चावे घेत मारहाण केल्याची घटना काशिमीराच्या जनतानगर भागात घडली आहे.

Wife buys quarrels from a woman on the issue | मोबाइलवरून झालेल्या वादातून महिलेने घेतले शेजाऱ्यांना चावे

मोबाइलवरून झालेल्या वादातून महिलेने घेतले शेजाऱ्यांना चावे

मीरा रोड  - पतीचा मोबाईल पत्नीने परत मागितला म्हणून संतप्त शेजारणीने पत्नीसह शेजाऱ्यांना चावे घेत मारहाण केल्याची घटना काशिमीराच्या जनतानगर भागात घडली आहे.

शनिवारी रात्री ९ च्या सुमारास उषा प्रकाश सोनावणे (५१) यांच्या पतीचा मोबाईल शेजारी राहणाºया ललिता विनोद चांदोलकर (३०) यांनी फोन करण्यासाठी घेतला होता. काम झाल्यावर तो परत मागितला असता ललिताने देण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या हातून उषा यांनी फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता ललिताने धक्का दिला. प्रकाश मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण केली. उषा यांच्या दोन्ही मनगटांस चावा घेतला. शेजारी असलेले वनिता व प्रकाश राणे दाम्पत्य सोडवण्यास आले असता, वनिता यांना मारहाण करुन प्रकाश यांच्या हाताच्या तळव्यास चावा घेतला. छोटेलाल यादव हा शेजारी सोडवण्यास आला असता, त्याच्या हातालादेखील तिने चावा घेतला.

उषा यांची नात श्रृती (१५) हिलासुध्दा मारहाण केली. त्यानंतर ब्लेडने स्वत:च्या दोन्ही हातांवर जखमा करुन, माझ्या जिवाचे बरंवाईट झाल्यास तुमच्याविरोधात तक्रार करेन अशी धमकी ललिताने सर्वांना दिली. याप्रकरणी उषा सोनवणे यांनी काशिमीरा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Wife buys quarrels from a woman on the issue