बजरंगबलीच्या नावाचा निवडणुकीत वापर का?; बागेश्वर महाराजांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 08:20 IST2023-05-09T08:19:41+5:302023-05-09T08:20:36+5:30

निवडणुकीत धार्मिक प्रचाराचे महत्त्व वाढले असून, राजकीय व्यक्तींच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करणे चुकीचे असल्याचे मत बागेश्वर महाराज यांनी व्यक्त केले.

Why use Bajrangbali's name in elections?; Bageshwar Maharaj expressed his displeasure | बजरंगबलीच्या नावाचा निवडणुकीत वापर का?; बागेश्वर महाराजांनी व्यक्त केली नाराजी

बजरंगबलीच्या नावाचा निवडणुकीत वापर का?; बागेश्वर महाराजांनी व्यक्त केली नाराजी

अंबरनाथ : निवडणुकीत धार्मिक प्रचाराचे महत्त्व वाढले असून, राजकीय व्यक्तींच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करणे चुकीचे असल्याचे मत बागेश्वर महाराज यांनी व्यक्त केले. राजकीय प्रश्नांना बगल देत महाराजांनी निवडणुकीमध्ये बजरंगबलीच्या नावाचा वापर करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

अंबरनाथमध्ये बागेश्वर महाराज यांचा तीन दिवसीय हनुमान कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी बागेश्वर महाराज यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. 

...ते दिवस विसरणे कठीणच'; मणिपूरमधील महाराष्ट्राचे विद्यार्थी संध्याकाळी मुंबईत दाखल

कर्नाटकमधील बजरंग दलावर बंदी घालण्याच्या विषयावर विचारले असता बजरंग दल ही एक विचारसरणी असून, त्या विचारसरणीला समाजातील काही घटक विरोध करू शकतील. मात्र तेच घटक बजरंगबलीला प्रत्यक्षात विरोध करणार नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असून, त्याचाच पुढचा टप्पा आता हिंदू राष्ट्र स्थापन होणे गरजेचे आहे. पूर्वी ईश्वराच्या प्रचारासाठी व्यक्तीचा माध्यम म्हणून वापर केला जात होता. हल्ली ईश्वराला माध्यम करून व्यक्तीचा प्रचार करण्याची प्रथा सुरू झाली आहे. ती प्रथा बंद करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सर्व धर्माच्या लोकांना महत्त्व

हिंदू राष्ट्रामध्ये इतर धर्माच्या लोकांना तेवढेच महत्त्वाचे स्थान राहणे हीदेखील गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्यास जातीयवादी शक्तींना स्थान राहणार नाही आणि जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होणार नाही. 

हल्ली देवांच्या नावावरच सर्व निवडणुका लढवल्या जातात, मात्र भविष्यात हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्यास देवाच्या नावावर निवडणूक लढवण्याची गरजच भासणार नाही आणि केवळ विकासाच्या नावावर निवडणूक लढवल्या जातील, अशी भूमिका त्यांनी मांडली. 
देशात हिंदू बहुसंख्य असताना राम मंदिर उभारण्यासाठी ५० वर्षे वाट का पाहावी लागली, आजही कृष्ण जन्मभूमीबाबत निर्णय घेता येत नाही ही शोकांतिका आहे. सनातन हिंदू धर्म वाचवायचा असेल तर शिक्षणासोबत धार्मिक शिक्षणाचीही गरज त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Why use Bajrangbali's name in elections?; Bageshwar Maharaj expressed his displeasure