जितेंद्र आव्हाडांना अटक का नाही ?
By Admin | Updated: August 18, 2015 23:23 IST2015-08-18T23:23:24+5:302015-08-18T23:23:24+5:30
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून संपूर्ण राज्यात वादविवाद सुरु असताना राष्ट्रीय एकात्मता रक्षा अभियानाने तर चक्क शिवाजी महाराजांच्या वंशजावरच

जितेंद्र आव्हाडांना अटक का नाही ?
ठाणे : बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून संपूर्ण राज्यात वादविवाद सुरु असताना राष्ट्रीय एकात्मता रक्षा अभियानाने तर चक्क शिवाजी महाराजांच्या वंशजावरच अविश्वास दाखवला आहे. शिवाजी महाराजांचे वंशज आणि खा. उदयनराजे भोसले यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांची भूमिका मान्य नसल्याचे मत अभियानाचे अध्यक्ष दिलीप अलोणी व्यक्त केले आहे. पुरंदरे यांनी मांडलेल्या इतिहासाला छेद देण्याचे लिखाण पुरषोत्तम खेडेकर आणि श्रीमंत कोकाटे करत असून त्यांच्यावर देखील त्यांनी जाहीर टीका केली आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण झाले असून यात राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. मनसे आणि सेनेने पुरस्काराला पाठींबा दर्शवला असून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने विरोध केला आहे. आ. जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता रक्षा अभियानाच्या वतीने मंगळवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. सध्या महाराष्ट्रात सगळीकडे संभाजी ब्रिगेड शिवसन्मान जागर परिषद घेण्याचे काम करीत आहेत. आव्हाड हे अशा परिषदेमधून जातीय द्वेष पसरविण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भावना भडकावल्याचा गुन्हा दाखल होऊनही पोलीस त्यांना अटक करीत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)