शहरं
Join us  
Trending Stories
1
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
2
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
3
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
4
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
5
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
6
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
7
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
8
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
9
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
10
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
11
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
12
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
13
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
14
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
15
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
16
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
18
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
19
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
20
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

सत्तेसाठी काय पण...! शिवसैनिकही झाले चौकीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 3:48 AM

शिवसैनिकही झाले चौकीदार : पक्षाचे अस्तित्व पणाला लावल्याचा आरोप

अजित मांडके ठाणे : चौकीदार चोर है... असा नारा देणारे शिवसैनिकही आता म्हणू लागले आहेत, मैं भी चौकीदार हूँ...! त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक मात्र चांगलाच चक्रावला आहे. काही नगरसेवकांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हा नारा दिला आहे. शिवसेनेच्या या घूमजावामुळे सत्तेसाठी काय पण, असा संदेश मतदारांमध्ये जात असून, ठाणे लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारासाठी सेनेच्या वाघाने भाजपपुढे नांगी टाकल्याचेही बोलले जात आहे.

राज्यभरात विविध ठिकाणी मेळावे घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी चौकीदार चोर है... असा नारा देत विरोधकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता; परंतु आता लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे; मात्र ही युती केवळ पक्षस्तरावर असून, बऱ्याच ठिकाणी युतीच्या कार्यकर्त्यांचे अद्यापही मनोमिलन झालेले नाही.या कार्यकर्त्यांच्या डोक्यात हळूहळू का होईना, अब की बार, फिर से मोदी सरकार... हा नारा उतरवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांकडून होऊ लागला आहे; मात्र यामुळे शिवसेना आपले स्वत:चे अस्तित्व गमावत असल्याची टीका होऊ लागली आहे. परंतु, युती नव्हती, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी काही चुका झाल्या असतील, परंतु आता युती झाली असल्याने, झाले गेले विसरून एकदिलाने काम करण्याचा संदेश दोन्ही पक्षांतील वरिष्ठ मंडळी कार्यकर्त्यांना देत आहेत.राजकीय गरज म्हणून भाजपशी युती करण्यापर्यंत ठीक होते; परंतु भाजपसोबत मैं भी चौकीदार हूँ... असा नारा देऊन शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आपले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि टिवटर हॅण्डलही त्याच आशयाचे ठेवत असल्याने पक्षाचे अस्तित्वच पणाला लावल्याचे निष्ठावंत शिवसैनिक बोलून दाखवत आहेत.तळागाळातील शिवसैनिक युती मान्य करायला तयार नाहीत. परंतु, पक्षप्रमुखच अमित शहांची गळाभेट घेत असतील, तर आम्ही वाद कशाला घालायचे, असे म्हणत ते दिलजमाई करू लागलेत. परंतु सेनेकडून दिला जाणारा मै भी चौकीदारचा नारा म्हणजे शिवसैनिकांना अतिशयोक्ती वाटत आहे. त्यामुळे शिवसेना भाजपच्या ताटाखालचे मांजर झाल्याची भावना शिवसैनिकांच्या मनात घर करू लागली आहे. सेनेचा ढाण्या वाघ संपला असून सत्तेसाठी काय पण करण्याची तयारी केल्याने त्याचे पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक