आम्ही तीन महिन्यांपूर्वीच मॅच जिंकलो : मुख्यमंत्री शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 08:34 IST2022-10-25T08:34:45+5:302022-10-25T08:34:57+5:30

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाटला उपस्थिती लावली होती.

We won the match three months ago: Chief Minister Shinde | आम्ही तीन महिन्यांपूर्वीच मॅच जिंकलो : मुख्यमंत्री शिंदे

आम्ही तीन महिन्यांपूर्वीच मॅच जिंकलो : मुख्यमंत्री शिंदे

ठाणे : रविवारी मेलबर्न स्टेडियमवर भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला, पण आपण तीन महिन्यांपूर्वी एक मॅच जिंकलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे गटाच्या युवासेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते तरुणाईसमोर बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाटला उपस्थिती लावली होती. तलावपाळी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. काल भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच होती. या सामन्यात बाळासाहेबांची शिवसेनेचे फलक रविवारी मेलबर्न स्टेडियमवर झळकले.
भारताने या ऐतिहासिक सामन्यात पाकिस्तानला हरविले. तीन महिन्यांपूर्वी आपणही एक सामना खेळलो आणि जिंकलो, असे ते म्हणाले.

Web Title: We won the match three months ago: Chief Minister Shinde