संजय राऊत यांना आम्ही महत्त्व देत नाही, श्रीकांत शिंदे उतरले ठाण्याच्या रस्त्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 15:15 IST2022-06-28T15:13:02+5:302022-06-28T15:15:00+5:30

शिंदे गटाची सेना हीच खरी सेना असून लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा त्यांनी केला. 

We don't care about Sanjay Raut, Shrikant Shinde took to the streets of Thane | संजय राऊत यांना आम्ही महत्त्व देत नाही, श्रीकांत शिंदे उतरले ठाण्याच्या रस्त्यावर 

संजय राऊत यांना आम्ही महत्त्व देत नाही, श्रीकांत शिंदे उतरले ठाण्याच्या रस्त्यावर 

ठाणे : संजय राऊत यांना आम्ही महत्त्व देत नसून ते केवळ फिल्मी डायलॉग मारत आहेत. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून आमचाच विजय होईल, संपूर्ण ठाणे जिल्हा आमच्या पाठीशी आहे, असा विश्वास कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे गटाची सेना हीच खरी सेना असून लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा त्यांनी केला. 

सोमवारी सकाळी शिंदे समर्थकांनी पुन्हा एकदा ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले. सुरुवातीला  टेंभीनाका परिसरात शिंदे समर्थकांनी मोठी गर्दी केली. यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर शिंदे समर्थक आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर पोहोचले. खा. शिंदे म्हणाले की, आम्ही कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन करत नसून केवळ आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. आमची शिवसेना वेगळी नाही. ती बाळासाहेबांच्या विचारांवर हिंदुत्वावर चालते. त्या शिवसेनेत आम्ही आहोत. ४० आमदारांचा आत्मा मेला असून त्यांचे मृतदेह परत येतील या राऊत यांच्या टीकेचाही खा. शिंदे यांनी समाचार घेतला.  


राऊत यांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देत नसून सर्वोच्च न्यायालयात विजय आमचाच आहे. त्यांच्या बाेलण्यामुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. आम्ही शांंत आहाेत हे लक्षात ठेवा.

Web Title: We don't care about Sanjay Raut, Shrikant Shinde took to the streets of Thane