आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 11:24 IST2025-09-11T11:23:32+5:302025-09-11T11:24:12+5:30

ठाणे जिल्ह्यात असलेल्या मुरबाड तालुक्यातील अनेक पर्यटक हे सालाबादप्रमाणे नेपाळमध्ये पशुपतिनाथ मंदिरात गेले आहेत.

We are safe in Nepal; No inconvenience; Tourists from Thane district describe the situation | आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती

आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती

-प्रकाश जाधव, मुरबाड (जि. ठाणे) 
मुरबाड तालुक्यातील ११७ पर्यटक नेपाळमधील काठमांडू आणि पोखरामध्ये अडकले आहेत. मात्र, आमची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नसल्याची माहिती पर्यटक म्हणून गेलेले मिलिंद मडके व माजी नगराध्यक्षा अर्चना विशे यांनी ‘लोकमत’ला दिली.

तालुक्यातील अनेक पर्यटक हे सालाबादप्रमाणे नेपाळमध्ये पशुपतिनाथ मंदिरात गेले आहेत. मडके, रामभाऊ दळवी, सुधीर तेलवणे, महेंद्र तोंडलीकर, अर्चना विशे, नितीन सूर्यवंशी, संध्या कदम, संगीता साबळे असे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. 

त्यातील काही पर्यटकांनी परतीच्या प्रवासासाठी विमानाची, तर काहींनी रेल्वेची तिकिटे काढलेली आहेत. आता विमानसेवा पूर्ववत होण्याची वाट पाहत आहोत, असे पोखरा येथून नितीन सूर्यवंशी यांनी सांगितले.

Web Title: We are safe in Nepal; No inconvenience; Tourists from Thane district describe the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.