शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वॉटरफ्रंटचे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 12:38 AM

महाराष्ट्र किनारपट्टी व्यवस्थापन नियामक मंडळाच्या परवानगीशिवाय वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटची कामे सुरू केल्याने ती तत्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

ठाणे : महाराष्ट्र किनारपट्टी व्यवस्थापन नियामक मंडळाच्या परवानगीशिवाय वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटची कामे सुरू केल्याने ती तत्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, आता कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनला केंद्राने मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने ही कामे सुरू होण्याची आशा महापालिकेने व्यक्त केली आहे. नागलाबंदर येथे कोणत्याही प्रकारची कांदळवनाची हानी झाली नसल्याचा अहवालही कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. तसेच इतर प्रकल्पांच्या ठिकाणी कांदळवनाची हानी झाली नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यानुसार, दोन महिने बंद असलेले हे प्रकल्प लवकरच सुरू होतील, अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली.ठाणे शहराला ३२ किमीचा खाडीकिनारा लाभला आहे. त्याचा विकास करण्याचा कार्यक्रम ठाणे महापालिकेने हाती घेतला होता. त्यानुसार, १३ ठिकाणी त्याचा विकास केला जाणार होता. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात सात ठिकाणच्या वर्क आॅर्डरही दिल्या आहेत. त्यातील प्रत्यक्षात चार ठिकाणी कामही सुरू केले. खारेगाव, नागलाबंदर, कोपरी, साकेत आणि बाळकुम येथील खाडीकिनारा विकसित करण्यासाठी नियोजन करून त्यावर २२४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. तर कोलशेत, वाघबीळ, कळवा येथील काम दुसऱ्या टप्प्यात सुरूहोणार आहे. मात्र, खाडीकिनाºयावरील जागा पाणथळ भूमी असून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने तेथे उद्यान, जॅगिंग ट्रॅकसारख्या सोयी करताना पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात पाणी साचून परिसरामध्ये हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यानुसार, एक हजार चौरस मीटरपेक्षा जास्त घनता असलेल्या खारफुटीच्या क्षेत्राभोवती ५० मीटर बफर झोन निर्माण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनीसुद्धा यासंदर्भात समिती नेमून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीने पाहणी केल्यानंतर अहवाल तयार केला जाणार आहे.या समितीच्या माध्यमातून पाहणी केल्यानंतर अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर, जर एखाद्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर तेथून पुढे काम सुरूकरणार आहे. परंतु, तशी स्थिती निर्माण होऊ शकत नसल्याचेही पालिकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. महाराष्टÑ किनारपट्टी व्यवस्थापन नियामक मंडळाने या प्रकल्पांची कामे थांबवण्याचे आदेश दिले. नागलाबंदर येथे कांदळवनाची हानी झाल्याच्या मुद्यावरून ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार, इतर ठिकाणीसुद्धा अशा प्रकारे हानी झाल्याची शक्यता व्यक्त करून इतर ठिकाणची कामेही दोन महिन्यांपासून बंद होती. परंतु, नागलाबंदर येथे कांदळवनाची कोणत्याही प्रकारे हानी झाली नसल्याचा दावा पालिकेने केला. येथील पाहणी वनविभाग, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयामार्फत करण्यात आली. त्यानंतर, याठिकाणी तशी कोणतीही हानी झाली नसल्याचा अहवाल कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर झाल्याची माहिती पालिकेच्या संबंधित विभागाने दिली. त्याशिवाय, इतर ठिकाणी सुरू असलेल्या वॉटरफ्रंटच्या कामाच्या ठिकाणीसुद्धा कांदळवनाची हानी झाली नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. तसेच सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचेही म्हणणे आहे.दरम्यान, २००५ मध्ये येथे जशी परिस्थिती होती, ती पूर्ववत करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले. त्यानुसार, गुगल इमेजही तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या कामांमुळे येथील अनधिकृत बांधकामे हटवून कांदळवनाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.>सीझेडएम प्लॅन मंजूर झाल्यास कामास सुरुवातमुंबईचा कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन हा दोन महिन्यांपूर्वी मंजूर झाला आहे. परंतु, ठाणे आणि पालघरचा हा प्लॅन अद्याप केंद्राकडून मंजूर झालेला नाही. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस तो मंजूर होईल, अशी आशा पालिकेला होती. परंतु, अद्याप तो मंजूर झालेला नाही. त्याला मंजुरी मिळाल्यास मागील दोन महिन्यांपासून थांबलेली कामेसुद्धा सुरूकरण्यास वाव असल्याची माहिती पालिकेचे अधिकारी मोहन कलाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.