शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलोली धरणातून पाणीपुरवठा झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:04 IST

वाटपात होणार बदल : एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी उचलणार, तळ गाठल्याने शुद्धीकरणात अडचणी

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने या धरणातील पाणी उचलण्याचे काम बंद करण्यात आले आहे. धरणातील पाणी उचलणे बंद झाल्याने त्याच्या मोबदल्यात एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी उचलण्याचे काम जीवन प्राधिकरणाने सुरू केले आहे. त्यामुळे पाण्याच्या वाटपात काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे.चिखलोली धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने या धरणातील पाणी शुद्ध करण्यात अडचणी येत आहेत. पाणी शुद्धीकरण यंत्रणा अपुरी पडत असल्याने पूर्व भागात दूषित पाणीपुरवठा होत होता. धरणातील पाणी हे मातीमिश्रित येत असल्याने आता या धरणातील पाणी उचलण्याचे काम बंद केले आहे. त्यातच, धरणाच्या ठिकाणी काम सुरू असल्याने त्या कामातही अडथळा निर्माण होत होता. अखेर, जीवन प्राधिकरणाने चिखलोली धरणातून होणारे सहा दशलक्ष लीटर एवढे पाणी थेट धरणातून न उचलता एमआयडीसीकडून उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

चिखलोलीचे पाणी बंद झाल्याने आता एमआयडीसीने पूर्वीचे १० आणि चिखलोली धरणाच्या पाण्याच्या कमतरतेमुळे अतिरिक्त सहा दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणार असल्याने आता गुरुवार ते शनिवारपर्यंत पाणीवितरणात काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. हे तीन दिवस नागरिकांना त्रासाचे जाणार आहे. उर्वरित दिवशी पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे. अंबरनाथ पूर्वेला या धरणातून पाणीपुरवठा होतो. मागील काही दिवसांपासून पाणीटंचाई जाणऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे.

पाणीसमस्येवर विशेष बैठकीची मागणीबदलापूरमध्ये काही महिन्यांपासून पाणीटंचाई तीव्र होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी यासंदर्भात चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी विशेष सभा बोलवण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केली आहे. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून प्रियेश जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसºयाच दिवशी ही मागणी करण्यात आली आहे. सध्या बदलापूरमध्ये पाणीटंचाई तीव्र होत चालली आहे. निवडणूक काळातही यामुळे लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. आचारसंहितेमुळे काही बंधने असल्याने याबाबत निर्णय घेता येत नव्हते. परंतु, आता निवडणूक झाली असल्याने काही महत्त्वपूर्ण बाबींसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरणbadlapurबदलापूर