शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बातरेपाडा रावतेपाड्यात नदीपात्रात खड्डा खोदून मिळते घोटभर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:59 IST

भिंवडी तालुक्यातील मैदे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या बातरेपाडा, रावतेपाडा आणि हारेपाड्यातील आदिवासी - कातकरी वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

- रोहिदास पाटीलअनगाव - भिंवडी तालुक्यातील मैदे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या बातरेपाडा, रावतेपाडा आणि हारेपाड्यातील आदिवासी - कातकरी वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील महिला हंडाभर पाण्यासाठी गावाबाहेरील नदी पात्रात खड्डा खोदून दूषित पाणी घेऊन येतात. दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या तीव्र पाणी टंचाईकडे भिवंडी पंचायत समिती पाणी पूरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो आहे. दरम्यान, पाणी टंचाईबाबत वारंवार सांगूनही याप्रकरणी काहीही उपाय न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी गटविकास अधिकारी तसेच पाणीपुरवठा अभियंत्यांना घेराव घातला.बातरेपाडा, रावते पाडा, हारेपाडा येथील परिसरातील महिला नदीत खड्डा खोदून जिथे ओहोळ दिसेल तिथे पाणी गोळा करतात. पाणी दूषित आहे हे दिसत असूनही स्वत:सह मुलाबाळांना देखील तेच पाणी देतात. या भागातील बोरवेलचे पाणी देखील दूषित आहे. खूप प्रयत्न करून हंडाभर पाणी मिळाले तरी ते पिवळे असते. भिवंडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या पाड्यामध्ये पाणी टंचाई असल्याचे लेखी निवेदन पाणीपुरवठा उपअभियंता ए. जी. राऊत, शाखा अभियंता सुदेश भास्करराव यांना सहा महिन्यांपूर्वी दिलेले आहे. असे असतानाही पाणीपुरवठा विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील आदिवासींना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. या पाड्यामधील टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करतानाही दिसत नाही. या तीनही पाड्यात पाणी टंचाई असल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी तसेच पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे केलेल्या आहेत. महिनाभरापूर्वी पाण्यासाठी महिलांची भांडणे झाली, त्याबाबत पडघा पोलिसांत तक्र ार दाखल झाली असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती मैदे गावातील सुरेखा पाटील यांनी दिली.येथील आदिवासींना खड्ड्यातील पाणी प्यावे लागत असून येथील लोकप्रतिनिधी याकडे लक्ष का देत नाहीत? निवडणुकीत मते मागतात, विकास करण्याची आश्वासने देतात. यांना आमच्या समस्या दिसत नाहीत काय, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.या पाड्यात दरवर्षी पाणी टंचाई होते. ती दूर करण्याचे काम प्रशासनाचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. येथे तात्काळ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. - आशा भोईर, संघटक, श्रमजीवी संघटना, भिंवडी तालुकाया पाड्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हे खरे आहे. ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- भुºया गव्हाले, ग्रामसेवक, ग्रामपंचायत मैदे

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळthaneठाणे