शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर भागात पुढील तीन वर्षे पाणीटंचाई कायम, ठामपाने न्यायालयात केलेल्या दाव्याला छेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 03:08 IST

एकीकडे दीड वर्षापूर्वी ठाणे महापालिकेने घोडबंदर भागाला पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचे शपथपत्र न्यायालयास सादर केले होते. परंतु...

- अजित मांडकेठाणे : एकीकडे दीड वर्षापूर्वी ठाणे महापालिकेने घोडबंदर भागाला पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचे शपथपत्र न्यायालयास सादर केले होते. परंतु, त्याला छेद देऊन याच महापालिकेने घोडबंदर भागात पाणीसमस्या अद्याप कायम असून ती सुटण्यास आणखी तीन वर्षांचा कालावधी जाईल, असेही स्पष्ट केले आहे.पालिकेने जाहीर केलेल्या या भूमिकेमुळे घोडबंदर भागात जर नव्याने कोणी घर घेत असेल, तर त्यांना जणू पालिकेने सावधानतेचाच इशारा दिला आहे. यामुळे नव्याने गृहसंकुले उभारणाऱ्या विकासकांनाही ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.बुधवारी झालेल्या महासभेत घोडबंदर भागातील हिरानंदानी पार्क या गृहसंकुलाला पाणी देण्याच्या मुद्यावरून रान पेटले होते. या इमारतीच्या बिल्डिंग लाइन व सर्व्हिस रोडमधील जागेतून जलवाहिनीचे काम पूर्ण केल्याचे पाणीपुरवठा विभागाने मान्य केले आहे. तसेच याच जलवाहिनीवरून २०१७ मध्ये टॅप मारल्याचेही मान्य केले आहे. या टॅपवरून प्रकल्पाच्या अंतर्गत टाकलेल्या जलवाहिनीवरूनच या प्रकल्पातील काही इमारतींना स्वतंत्र नळजोडण्यांतून २०१८ मध्ये योग्य ती मंजूर प्रक्रिया पूर्ण करून दिल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय, अंतर्गत भागातही टॅप मारून वाहिनी टाकल्याचे या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.विकासकांकडून धूळफेकएकीकडे हे मान्य केले असतानाच दुसरीकडे मात्र घोडबंदर भागात पाणीसमस्या आजही कायम असल्याचे याच विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळेच येथील विकासकांना त्यांचे गृहप्रकल्प उभारताना वापर परवान्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र त्या अटीवरच दिले जात असल्याची धक्कादायक बाबही या विभागाने मान्य केली आहे. याचाच अर्थ पाणी नसतानाही विकासकांना नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा घाट पालिकेकडून घातला जात आहे. याच प्रमाणपत्राच्या आधारे नव्याने विकासकही येथील गृहप्रकल्पांची कामे पूर्ण करून येथे घरे घेणाºया नागरिकांच्याही डोळ्यांत धूळफेक करत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.पालिकेने केली न्यायालयाची दिशाभूलदीड वर्षापूर्वी एका नागरिकाने घोडबंदर भागातील पाणीटंचाईच्या निमित्ताने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर, ही समस्या सुटत नाही, तोपर्यंत येथील प्रकल्पांना ओसी देऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.त्यावेळेस पालिकेने आपली बाजू मांडताना ठाणे शहरात मुबलक पाणी असल्याचे न्यायालयात सांगितले होते. पालिकेने घेतलेल्या या भूमिकेनंतर या भागातील विकासकांना दिलासा मिळाला होता.परंतु, आता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेच या भागात पाण्याची समस्या कायम असल्याचे मान्य केले आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे या विभागाने एकीकडे रहिवाशांची फसवणूक तर केली आहेच, शिवाय न्यायालयाचीही दिशाभूल केल्याचे यातून उघड होत आहे.त्यांनी साधले आर्थिक हितजुने ठाणे अपुरे पडू लागल्याने नवे ठाणे अर्थात घोडबंदरकडे पाहिले जात आहे. मागील सात ते आठ वर्षांत या भागाचा विकास झपाट्याने झाला आहे. रस्ता रुंदीकरण झाले आणि या भागात बड्या बिल्डरांनी घुसखोरी करण्यास सुरुवात केली. आता तर अनेक नामवंत विकासकांच्या टोलजंग इमारतींची कामे येथे सुरू आहेत.अनेक इमारती तयार झाल्या असल्या तरी त्याठिकाणचे भाव अधिक असल्याने बहुसंख्य इमारतींमधील सदनिका शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांची विक्री करण्यासाठी विकासक आता ग्राहकांसाठी विविध योजनांचे आमिष दाखवत आहेत. पाणी हेसुद्धा त्यातील एक आमिष असल्याचे आता स्पष्ट होत आहे.घोडबंदर भागात आजही नव्याने २०० हून अधिक प्रकल्पांची कामे सुरू असून त्यांनादेखील आता याच माध्यमातून नाहरकत प्रमाणपत्र दिले गेले की काय, असा संशयही यानिमित्ताने निर्माण झाला आहे. पालिकेच्या या भूमिकेमुळे विकासकांचे बुकिंगही होत आहे आणि पालिकेच्या काही संबंधित अधिकाऱ्यांचे यातून आर्थिक हित साधले जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.आजही अनेक सोसायट्यांना टँकरचे पाणीघोडबंदर भागात नव्या, जुन्या अनेक इमारती उभ्या असून त्यातील बहुसंख्य सोसायट्यांना आजही टँकरने पाणीपुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे. एकेका इमारतीला रोज दोन ते तीन टँकरनेही पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पालिकेने मान्य केलेली बाब या अर्थाने निश्चितच खरी म्हणावी लागणार आहे.घोडबंदरला पुरेसा पाणीपुरवठाघोडबंदर भागात नव्याने इमारती उभ्या राहत असल्या, तरी येथील पाच लाख लोकसंख्येला पुरेल एवढा पुरेसा पाणीपुरवठा या भागाला होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. आजघडीला या भागात ९१ दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असताना येथे ८८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. तसेच या भागातील पाणीपुरवठा योजना आणखी सक्षम करण्यासाठी रिमॉडेलिंगची योजनादेखील पुढे आली आहे.त्यानुसार, त्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असून ही योजना पूर्ण होण्यास आणखी तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षे घोडबंदरकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार असल्याचे पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी लोकमतमध्ये २० जून रोजी प्रसिद्ध झालेल्या मीरा- भार्इंदरचे पाणी ठाण्याच्या विकासकाला दिल्याचा आरोप या वृत्ताबाबत पाठवलेल्या खुलाशात स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईthaneठाणे