शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

कचऱ्यामुळे होतेय जलप्रदूषण, आधारवाडी डम्पिंग ओव्हरफ्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 1:10 AM

कल्याण शहरातील ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपली आहे.

कल्याण : शहरातील ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपली आहे. त्यावरील कचरा आता कल्याण खाडीच्या पाण्यात मिसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी, आता डम्पिंगमुळे जलप्रदूषण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.केडीएमसी हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन कचरा उचलला जातो. हा कचरा ओला व सुका, असे वर्गीकरण न करता सरसकट गोळा करून आधारवाडी डम्पिंगवर टाकला जातो. मात्र, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जात नाही. तेथे कचºयाचा किमान २५ मीटर उंच भला मोठा डोंगर तयार झाला आहे. कचरा जास्त असल्याने डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाले असून, कचरा कल्याणच्या खाडीत मिसळत आहे. त्यामुळे खाडी प्रदूषित होत आहे. प्लास्टिकच्या कच-याचेही प्रमाणही अधिक असल्याने ते खाडीच्या पाण्यात मिसळत आहे. मात्र, त्याकडे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट नियमावलीनुसार कचरा डम्पिंग ग्राउंड हे पाणथळ जागेपासून दूर असले पाहिजे. या निकषानुसार हे डम्पिंग ग्राउंड बसत नसल्याने ते बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळास गेल्या काही वर्षांपूर्वी दिले आहेत. मात्र, पर्यायी घनकचरा शास्त्रोक्त प्रक्रिया प्रकल्प अद्याप सुरू झालेले नसल्याने आधारवाडी डम्पिंगवर सुरू केलेला प्रकल्प पूर्ण क्षमतेनुसार चालविण्याऐवजी बंद करण्यात आला आहे.महापालिकेने उंबर्डे कचरा प्रकल्प उभारला असून, तेथे कचरा प्रक्रिया सुरू केली असती, तर काही प्रमाणात आधारवाडी डम्पिंगवर पडणारा कचरा कमी झाला असता. मात्र, उंबर्डे प्रकल्पास स्थानिक शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांनी विरोध केला. प्रकल्प बंदिस्त स्वरूपात करण्याची मागणी केली. त्यामुळे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच बंद आहे. दुसरीकडे प्रकल्प बंदिस्त स्वरूपाचा करता येत नाही, तशी तरतूदच उंबर्डे प्रकल्पात नाही, याकडे प्रशासनाने लक्ष वेधले. त्यामुळे कचरा विभागला जात नाही. प्रत्येक ठिकाणच्या कचºयावर त्या-त्या ठिकाणी प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. मात्र, अन्य ठिकाणी प्रकल्प उभारले गेलेले नाहीत.उंबर्डे प्रकल्पाला होतोय विरोधमुख्यमंत्र्यांसोबत ८ जुलैला झालेल्या बैठकीत त्यांनी कचरा प्रकल्पाची डेडलाइन पाळली जात नसल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पगार रोखा, असे आदेश दिले होते. त्याचबरोबर उंबर्डे प्रकल्प १५ सप्टेंबरपासून सुरू करा आणि बारावे प्रकल्प १५ मार्चला सुरू करा, अशी मुदत दिली होती.मात्र, १५ सप्टेंबरची मुदत हुकली आहे. उंबर्डे प्रकल्प अतिवृष्टीमुळे सुरू करता आला नसल्याची सबब प्रशासनाकडून दिली गेली आहे. आता त्याला नगरसेवकाचा विरोध आहे. उंबर्डे सुरू झाला नसल्याने आधारवाडी शास्त्रोक्तरीत्या बंद होऊ शकत नाही. परिणामी, कचºयाचा डोंगर वाढतच आहे.२० लाख घनमीटर मेट्रीक टन कचराआधारवाडी डम्पिंगची क्षमता किती आहे, असा सवाल घनकचरा व्यवस्थापनास विचारला असता हे डम्पिंग ग्राउंड हे डिझाइन डम्पिंग नाही. त्यामुळे त्याची क्षमता किती व काय असू शकते, हे सांगता येत नाही. २०१५ मध्ये आधारवाडी डम्पिंगवर १५ लाख घनमीटर मेट्रीक टन कच-याचा डोंगर होता. आज त्यात वाढ होऊन त्याठिकाणचा कचरा २० लाख घनमीटर मेट्रीक टन इतका झाला आहे.एमएमआरडीएने केडीएमसी हद्दीतील रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. दुर्गाडी ते टिटवाळादरम्यान काम सुरू असले तरी या कामाला आधारवाडी डम्पिंगच्या कचºयाच्या डोंगराचा अडसर आले. हा डोंगर दूर करण्यासाठी नुकतीच तीन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. त्यावेळी कचरा दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे कचरा पांगून तो खाडीत गेला असावा, अशी सबब घनकचरा विभागाकडून दिली जात आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे