शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टीएमटीची धुलाई, प्रवाशांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 01:55 IST

वाहक आणि चालकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे.

ठाणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ठाणे महापालिका परिवहनसेवेने बसची धुलाई सुरू केली आहे. कोरोनामुळे प्रवासी घटल्याने परिवहनच्या उत्पन्नावरदेखील परिणाम झाला आहे. वाहक आणि चालकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे.कोरोनाच्या सावटाखाली आता परिवहनच्या बसची धुलाई सुरू झाली आहे. कळवा, वागळे, मुल्लाबाग, आनंदनगर भागातील डेपोत प्रत्येक बस आतूनबाहेरून निर्जंतुक केल्या जात आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पावले उचलली असल्याचे परिवहन प्रशासनाने सांगितले. परिवहनसेवेतील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने मास्क व सॅनिटायझरवाटप बुधवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, उपायुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.तपासणी करण्याचा सल्लापरिवहनसेवेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सातत्याने विविध लोकांच्या संपर्कात येत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कामगिरीवर असताना त्यांनी मास्क अथवा रु मालाने नाक व तोंड झाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साबण व पाण्याने हात धुणे. ज्या कर्मचाऱ्यांना सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होत आहे किंवा अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत, आदी सूचना सर्व कर्मचाºयांना देण्यात आल्या आहेत.कोरोनाचा प्रतिबंध व नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहनसेवेकडून कर्मचाºयांना मास्कवाटप, हात धुण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, यासोबतच सर्व बसवर जनजागृतीपर पोस्टर्स, बसस्टॉपवर होर्डिंग, बॅनर लावून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच परिवहनसेवेत कार्यरत कर्मचारी यांच्या दैनंदिन हजेरीसाठी वापरण्यात येणारी बायोमेट्रिक हजेरी प्रक्रि या बंद केली असून, हजेरीपट ठेवून त्याद्वारे हजेरीची नोंद ठेवण्यात येत आहे.टीएमटीचे उत्पन्न पाच लाखांनी घटलेदुसरीकडे परिवहनच्या दैनंदिन उत्पन्नात पाच लाखांची घट झाली असून प्रवाशांची संख्यादेखील ४० हजारांनी रोडावली आहे. त्यामुळे याचा फटकाही परिवहनसेवेला सोसावा लागत आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस