तब्बेत बरी नसल्याने वक्फ बोर्ड निर्णयाच्या मातदानावेळी उपस्थित नव्हतो; खा. बाळ्या मामा यांचे स्पष्टीकरण
By नितीन पंडित | Updated: April 5, 2025 18:45 IST2025-04-05T18:45:40+5:302025-04-05T18:45:40+5:30
माझी बदनामी करून दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न

तब्बेत बरी नसल्याने वक्फ बोर्ड निर्णयाच्या मातदानावेळी उपस्थित नव्हतो; खा. बाळ्या मामा यांचे स्पष्टीकरण
नितीन पंडित
भिवंडी : तब्येत बरी नसल्याने वक्फ बोर्ड निर्णयाच्या मतदानावेळी मी उपस्थित राहू शकलो नाही मात्र विरोधक माझी बदनामी करून दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे स्पष्टीकरण भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहे.
संसदेत वक्फ बोर्ड निर्णयासंदर्भात झालेल्या मातदानावेळी वक्फ बोर्ड समितीचे सदस्य व भिवंडी लोकसभेचे खा. बाळ्या मामा यांच्या गैरहजेरीबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.त्यावर खासदार बाळ्या मामा यांनी आज स्पष्टीकरण दिले.तब्बेत बारी नसल्याने आपण मातदानावेळी संसदेत हजर राहू शकलो नव्हतो.याच दरम्यान आपण प्रमुख विश्वास्थ असलेल्या कार्ला येथील श्री एकविरा देवी यात्रेच्या बैठकीला देखील हजर नव्हतो,त्यावेळी कार्ला येथील जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये काही समाजकंटकांनी माझ्यावर खालच्या पातळीवर टिका केली होती.याविरोधात आपण भिवंडी पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.याच दिवशी वक्फ बोर्ड बिलाच्या मातदानादिवशी गैरहजर राहिल्याने विरोधकांनी मुस्लिम बांधवांमध्ये माझी बदनामी करण्याच्या हेतूने मेसेज पसरवले,मी वक्फ बोर्ड समितीचा सदस्य असल्याने प्रत्येक वेळी समितीच्या सभेत उपस्थित राहून या बिलाबाबत आमच्या पक्षाची व माझी भूमिका मांडली आहे.
केवळ तब्बेत बरी नसल्याने मला या मतदानाला उपस्थित राहता आले नाही.मात्र विरोधकांनी याच बाबीचा फायदा घेऊन माझी बदनामी करून दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र आपण आपल्या कामांच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देऊ व वक्फ बोर्डाच्या निर्णयासंदर्भात पक्ष व पक्षश्रेष्ठी जी भूमिका घेतली त्याबाजूने ठाम उभा राहू असेही खा बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले.