ठाणे महापालिका हद्दीत कोरोना चाचण्यांचे प्रमाण राज्यापेक्षा तिप्पट, विपिन शर्मा यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 05:14 AM2020-12-26T05:14:33+5:302020-12-26T05:14:53+5:30

CoronaVirus News in Thane : प्रत्येक दिवशी ठाण्यात अँटिजन तसेच आरटीपीसीआर अशा मिळून साडेपाच हजारांच्या घरात चाचण्या होत आहेत.

Vipin Sharma claims that the number of corona tests in Thane municipal area is three times higher than the state | ठाणे महापालिका हद्दीत कोरोना चाचण्यांचे प्रमाण राज्यापेक्षा तिप्पट, विपिन शर्मा यांचा दावा 

ठाणे महापालिका हद्दीत कोरोना चाचण्यांचे प्रमाण राज्यापेक्षा तिप्पट, विपिन शर्मा यांचा दावा 

Next

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात जुलैपासून वाढवलेल्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे अजूनही कायम असून शहरातील आजच्या लोकसंख्येनुसार १० लाख नागरिकांच्या मागे शहरात तब्बल तीन लाख ४४ हजार चाचण्या होत आहेत. हे प्रमाण राज्यापेक्षाही तिपटीहून अधिक आहे. राज्यात १० लाख नागरिकांच्या मागे केवळ ८३ हजार चाचण्या होत असून, चाचण्यांचे हे प्रमाण कायम राहिल्यास २० दिवसांत पॉझिटिव्हिटी दर हा ६ टक्क्यांपेक्षाही खाली येईल, असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त 
डॉ. विपिन शर्मा यांनी व्यक्त केला.
प्रत्येक दिवशी ठाण्यात अँटिजन तसेच आरटीपीसीआर अशा मिळून साडेपाच हजारांच्या घरात चाचण्या होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात चाचण्या होऊनही १२ मार्चपासून ते आतापर्यंतचा पॉझिटिव्हिटी रेट हा ६.५६ टक्के इतका आहे. तो ५ ते ६ महिन्यांपूर्वी जवळपास १३ टक्क्यांवर होता. जून महिन्यात शर्मा यांनी ठाणे महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा सर्वांत आधी त्यांनी चाचण्या वाढविण्यावरच भर दिला. शहरात आतापर्यंत सात लाख ८७ हजार ९८६ चाचण्या केल्या आहेत. हे प्रमाणदेखील राज्याच्या तुलनेत जास्त आहे.
२०११च्या जनगणनेनुसार १० लाख नागरिकांच्या मागे राज्यात चाचण्यांचे प्रमाण हे केवळ ९३ हजार २२५ इतके आहे. ते ठाणे महापालिका हद्दीत चार लाख ३० हजार ९३६ इतके आहे. तर २०२०च्या लोकसंख्येनुसार राज्यात १० लाख नागरिकांच्या मागे हेच प्रमाण ८३ हजार ५८० इतके असून, ठाणे शहरात मात्र तीन लाख ४४ हजार २२७ इतके आहे. राज्याच्या तुलनेत ते तीन पट जास्त आहे, असे ते म्हणाले.

शहरात रुग्णांच्या डिस्चार्जचे प्रमाणही वाढले आहे. सध्या ४२० रुग्णांना घरी सोडले जात आहे. हे प्रमाण ९६.२३ टक्के आहे. येत्या चार दिवसांत ते ९८ टक्क्यांवर जाण्याची शक्यता असून, सध्या ८२९ ॲक्टिव्ह केसेस असल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली. 
ॲक्टिव्ह केसेसचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने आता शहरातील कोविड हॉस्पिटलचे बेडदेखील रिकामे आहेत. आजघडीला तीन हजार ५७७ बेड उपलब्ध असून केवळ ७६२ बेडवर रुग्ण आहेत.
 उपलब्ध ४५० आयसीयू बेडपैकी २४४ बेड रिकामे आहेत, तर व्हेंटिलेटरही १९० पैकी १३४ उपलब्ध आहेत. ऑक्सिजनचा पुरवठाही मुबलक आहे. तो १३०० टन उपलब्ध असून केवळ २१५ टन ऑक्सिजनची सध्या मागणी आहे, असे डॉ. शर्मा म्हणाले. 

Web Title: Vipin Sharma claims that the number of corona tests in Thane municipal area is three times higher than the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.