भिवंडीत ख्रिस्ती धर्मप्रसारकांना जबर मारहाण; चार अज्ञातांवर गुन्हा दाखल 

By नितीन पंडित | Updated: September 26, 2022 16:56 IST2022-09-26T16:55:12+5:302022-09-26T16:56:29+5:30

अनुराग गिरीषकुमार पांडे उर्फ जस्टीन अब्राहम वय २२ रा.वाशी, नवी मुंबई हा आपला सहकारी पास्टर सुजित राघवन चिकोली यास सोबत घेऊन काटई ग्रामपंचायत हद्दीतील पिलानीपाडा येथील दळवी कुटुबीयांच्या घरी ख्रिश्चन धर्मप्रचाराच्या अनुषंगाने प्रवचन देण्यासाठी गेला होता.

Violent beating of Christian missionaries in Bhiwandi | भिवंडीत ख्रिस्ती धर्मप्रसारकांना जबर मारहाण; चार अज्ञातांवर गुन्हा दाखल 

भिवंडीत ख्रिस्ती धर्मप्रसारकांना जबर मारहाण; चार अज्ञातांवर गुन्हा दाखल 

भिवंडी - शहरानजीकच्या ग्रामीण भागात धर्म प्रचार करण्यासाठी गेलेल्या दोन ख्रिश्चन धर्म प्रचारकांना गुरुवारी अज्ञात व्यक्तींनी भिवंडीतील काटइ पिलानी पाडा येथे अडवून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत संबंधित धर्मप्रचारक गंभीर जखमी झाले असून मारहाण करणाऱ्या चार अज्ञात व्यक्तींवर रविवारी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुराग गिरीषकुमार पांडे उर्फ जस्टीन अब्राहम वय २२ रा.वाशी, नवी मुंबई हा आपला सहकारी पास्टर सुजित राघवन चिकोली यास सोबत घेऊन काटई ग्रामपंचायत हद्दीतील पिलानीपाडा येथील दळवी कुटुबीयांच्या घरी ख्रिश्चन धर्मप्रचाराच्या अनुषंगाने प्रवचन देण्यासाठी गेला होता. येथून वाशीकडे परत जाताना पिलानी पाडा येथे चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना रस्त्यातच अडवून रबरी पट्टा, बुक्के आणि चाबकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अनुराग गिरीषकुमार पांडे उर्फ जस्टीन अब्राहम यांच्या खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले असून त्यांच्या जवळील मोबाइल फोडून त्यांना धमकी दिली. या प्रकरणी अनुराग गिरीषकुमार पांडे उर्फ जस्टीन अब्राहम यांनी निजामपुरा पोलीस ठाण्यात चार अनोळखी लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Violent beating of Christian missionaries in Bhiwandi