शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : निवडणूक कामासाठी पाच हजार कर्मचाऱ्यांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 01:49 IST

निवडणूक कामासाठी अद्याप पाच हजार कर्मचारी कमी पडत असून, ही गरज भागवताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : विधानसभा निवडणूक कामासाठी ठाणे जिल्ह्यात ५४ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. सरकारी व निमसरकारी कर्मचा-यांसह विनाअनुदानीत शाळांचे १३ हजार ५०० कर्मचारी मिळून ही गरज भागवणे शक्य आहे. मात्र या शाळांनी न्यायालयात धाव घेऊन निवडणूक कामास नकार दिला आहे. त्यामुळे निवडणूक कामासाठी कर्मचा-यांची उणीव भासण्याची शक्यता आहे. अद्याप पाच हजार कर्मचारी कमी पडत असून, ही गरज भागवताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होत आहे.जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी जवळपास सात हजार बूथ तयार केले आहेत. या प्रत्येक बूथवर कमीत कमी पाच कर्मचा-यांसह एका शिपायाची आवश्यकता आहे. या ३५ हजार आवश्यक कर्मचा-यांच्या गरजेसाठी १२५ टक्के कर्मचारी पहिल्या प्रशिक्षणासाठी लागतात.या सुमारे ४२ हजार कर्मचा-यांसह बीएलओ म्हणून सात हजार कर्मचारी आणि १८ विधानसभा मतदारसंघांच्या आरओ आॅफिससाठी लागणारे पाच हजार कर्मचारी अशा ५४ हजार कर्मचा-यांची जुळवाजुळव जिल्हा प्रशासनास या विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी करावी लागत आहेत. त्यासाठी प्रशासनाची पुरती दमछाक सुरू आहे.जिल्ह्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाºयांसह शासकीय, तसेच खासगी शाळा आणि विनाअनुदानीत शाळांमधील शिक्षक व कर्मचारी मिळून ५४ हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी तैनात होणे शक्य आहे.पण विनाअनुदानीत शाळांनी या कामास नकार देत न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्या बाजून निकाला लागला. यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध कर्मचारी संख्येतून तब्बल १३ हजार ५०० विनाअनुदानीत शाळांचे कर्मचारी कमी झाल्यामुळे निवडणूक कामासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाची दमछाक होत आहे.या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुंबई आणि उपनगरातून दहा हजार कर्मचारी उपलब्ध केले आहेत. मात्र तरीदेखील पाच हजार कर्मचाºयांची कमतरता असून, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यास कारवाईजिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सात हजार बूथ निर्माण करण्यात आले आहेत. त्यासाठी राखीव कर्मचाºयांसह एकूण १२५ टक्के कर्मचाºयांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले. आता दुसºया टप्प्याच्या प्रशिक्षणासाठी यामधील ११० टक्के कर्मचाºयांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. यासाठी ३९ हजार कर्मचाºयांची गरज आहे. यासाठी निवड झालेल्या कर्मचाºयांनी प्रशिक्षणास उपस्थित राहण्याची गरज आहे. या प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास संबंधित कर्मचाºयांवर त्वरित कारवाई करण्याचे संकेत ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. या राष्ट्रीय कार्यात प्रामाणिक काम करणे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे या कामासाठी कर्मचारी वर्गाने गैरहजर न राहता उत्स्फूर्तपणे काम करण्याचे आवाहन नार्वेकर यांनी केले आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणे