Video! बदलापूर स्टेशनबाहेर रिक्षात घुसू पाहत होता नाग; 10 चा आकडा दाखविला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 11:57 IST2023-10-13T11:56:42+5:302023-10-13T11:57:31+5:30

पावसाळा नुकताच संपला आहे, ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. यामुळे सरपटणारे प्राणी देखील बाहेर पडू लागले आहेत.

Video viral! King Cobra was trying to enter a rickshaw outside Badlapur station; A number of 10 is shown... | Video! बदलापूर स्टेशनबाहेर रिक्षात घुसू पाहत होता नाग; 10 चा आकडा दाखविला...

Video! बदलापूर स्टेशनबाहेर रिक्षात घुसू पाहत होता नाग; 10 चा आकडा दाखविला...

पावसाळा नुकताच संपला आहे, ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. यामुळे सरपटणारे प्राणी देखील बाहेर पडू लागले आहेत. शहरी भागात तर या प्राण्यांचे अधिवासच संपल्यात जमा आहेत. यामुळे हे प्राणी नागरी वस्त्यांमध्ये दिसू लागले आहेत. बदलापूर स्टेशनबाहेरून आज एक धक्कादायक व्हिडीओ सेशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सापांचे बरेच प्रकार आहेत. परंतू, सर्वात खतरनाक म्हणून पिवळा धम्मक दिसणाऱ्या नागाची लोकांमध्ये धास्ती असते. तो फणा काढून जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याच्या पाठीमागील फण्यावर १० असा आकडा दिसतो. बदलापुरात याच नागराजाने ऐन गर्दीच्या वेळी दर्शन दिले आहे. 

बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील तिकीट खिडकीजवळ हा नाग पोहोचला होता. तिथे उभ्या असलेल्या रिक्षाच्या मागील गार्डवरून तो रिक्षाच्या छतावर चढू पाहत होता. गार्ड आणि रिक्षाच्या पत्र्याच्या आधार घेत हा नागराज जवळपास दीड-दोन फूट वर डोकावून पाहत होता. त्याला वर चढता येईना यामुळे त्याने दुसरीकडून जाण्यासाठी फणा काढला होता. 

हा सर्व प्रकार काही रिक्षाचालक आणि प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलमध्ये टिपला आहे. 


 

Web Title: Video viral! King Cobra was trying to enter a rickshaw outside Badlapur station; A number of 10 is shown...