Video : कंटेनर पलटी झाल्याने घोडबंदर-मुंबई मार्गावरील मंदावली वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 21:46 IST2019-05-29T21:45:03+5:302019-05-29T21:46:45+5:30
पुलाच्या कडठ्यामुळे अडकून राहिलेला कंटेनर हटवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

Video : कंटेनर पलटी झाल्याने घोडबंदर-मुंबई मार्गावरील मंदावली वाहतूक
ठाणे - ठाण्यातील कापुरबावडी पुलावर एक कंटेनर पलटी झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. तब्बल नऊ तासांच्या प्रयत्नांनंतर हा कंटेनर हटवण्यात अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली.
कापुरबावडी पुलावर कंटेनर उलटून रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर ऑईल सांडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. पुलाच्या कडठ्यामुळे अडकून राहिलेला कंटेनर हटवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.