व्हिडीओ - चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला मनसेने चोपलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 11:42 AM2018-10-08T11:42:53+5:302018-10-08T12:24:15+5:30

ठाण्यामध्ये चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला मनसेने चांगलाच चोप दिला आहे.

video maharashtra navnirman sena press conference in thane | व्हिडीओ - चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला मनसेने चोपलं 

व्हिडीओ - चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला मनसेने चोपलं 

Next

ठाणे - ठाण्यामध्ये चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला मनसेने चांगलाच चोप दिला आहे. लहान मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या एका परप्रांतीय आरोपीला मनसेने पकडून पत्रकार परिषदेत हजर केलं. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आरोपीला चोप दिला. 

जगदीश रॉय असं 53 वर्षीय आरोपीचं नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. एका लहान मुलीसोबत या आरोपीने अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेने या आरोपीला पकडल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली. तसेच आरोपीने आतापर्यंत तीन लहान मुलींशी अशाप्रकराचे गैरवर्तन केल्याचं ही कबूल केलं आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचं कृत्य समोर आल्याचं जाधव यांनी सांगितलं.

परप्रांतीय विकृतांवर तातडीने कारवाई करा अन्यथा मनसे स्टाईने आंदोलन करू असा इशाराही पत्रकार परिषदेत अविनाश जाधव यांनी दिला. तसेच संजय निरुपम यांच्या वक्तव्यामुळे युपी, बिहारच्या लोकांना असे कृत्य करण्यास बळ मिळते, निरुपम महाराष्ट्रातील घाण आहे, त्यांनाच मराठी लोकांनी महाराष्ट्रातून हकलून द्यावे असंही अविनाश जाधव म्हणाले.

 

 


 

Web Title: video maharashtra navnirman sena press conference in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.