Video - ठाण्यातील लोकमान्य नगर डेपोमध्येच टीएमटीची बर्निंग बस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 19:17 IST2023-01-09T19:16:21+5:302023-01-09T19:17:50+5:30
बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Video - ठाण्यातील लोकमान्य नगर डेपोमध्येच टीएमटीची बर्निंग बस
जितेंद्र कालेकर
ठाणे - लोकमान्य नगर बस डेपोमधील ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसला आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररुप धारण केल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने, या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या आगीची माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बसचे चालक दीपक सोनवणे आणि वाहक प्रकाश भोये यांनी लोकमान्य नगर ते वृंदावन सोसायटी मार्गावरुन पुन्हा लोकमान्यनगर डेपोमध्ये बस आणली होती. ती काही काळ विश्रांतीसाठी उभी केली असताना अचानक ही आग लागल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
ठाण्याच्या लोकमान्य नगर येथील डेपोमधील उभ्या असलेल्या TMT बसला आग. (व्हिडीओ - विशाल हळदे) pic.twitter.com/71ozsGcPCl
— Lokmat (@lokmat) January 9, 2023