Video : हेलिकॉप्टरच्या मदतीने पुरात अडकलेल्या 'त्या' 35 ग्रामस्थांची केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 15:03 IST2019-08-04T15:02:49+5:302019-08-04T15:03:08+5:30
हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या 35 जणांना कोलशेत येथे आणण्यात आलं आहे.

Video : हेलिकॉप्टरच्या मदतीने पुरात अडकलेल्या 'त्या' 35 ग्रामस्थांची केली सुटका
ठाणे - शनिवारपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील खडवलीनजीक असलेल्या नांदखुरी गावातील 35 जण पुराच्या पाण्यात अडकले होते. या सर्व जणांना वाचविण्यात भारतीय हवाई दलाला यश आलं आहे.
हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या 35 जणांना कोलशेत येथे आणण्यात आलं आहे. मुंबईसह राज्यात अतिवुष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपत्कालिन परिस्थितीतील यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच खडवली येथील पुरात अडकलेल्या ३५ ग्रामस्थांची हेलीकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी भारतीय हवाई दलाला केली होती.
खडवली येथे पुरात अडकलेल्या 35 जणांचा हेलिकॉप्टरद्वारे सुखरुप बाहेर काढण्यात आलं. #MumbaiRainpic.twitter.com/GlD1duv2rN
— Lokmat (@MiLOKMAT) August 4, 2019