शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

दुष्काळग्रस्त पशुधनासाठी मुंबईतील पशुवैद्यकांचा हातभार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:26 AM

२०० जनावरांना देणार पशुखाद्य : १५ सप्टेंबर रोजी भेट देणार

ठाणे : पूरग्रस्तांपाठोपाठ आता कोल्हापूर-सांगली परिसरातीलच जनावरांसाठी मदतीची गरज असल्याचे लक्षात घेऊन मुंबईतील पशुवैद्यकांनी मदतीचा हात देऊन निवडलेल्या २०० जनावरांच्या छावणीला येत्या १५ सप्टेंबर रोजी भेट देणार आहे. यावेळी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकांची संघटना (बोव्हेट ग्लोरी) व माजी विद्यार्थी संघटना (बोव्हेट १९७४-७८) आणि मुंबईस्थित पाळीव प्राण्यांसाठीची वैद्यकीय संघटना (पीपीएएम) या संघटना पशुखाद्यासह औषधे आणि त्या जनावरांची तपासणी करणार आहेत.

डॉ. सुभाष चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामुख्याने डॉ. आनंदराव माळी, डॉ. सुहास राणे व डॉ. प्रशांत बिराजदार असे पशुवैद्यकांचे पथक गठीत केले असून साताऱ्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व माण तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. आरिफ इनामदार यांच्या सहकार्याने रविवारी दिवडी, तालुका माण येथील चारा छावणीतील २०० जनावरांना मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी पशुखाद्याच्या १० किलोच्या २०० पिशव्या, प्रत्येकी एक किलो चिलेटेड खनिजाच्या २०० पिशव्या व या सर्व जनावरांना जंतनिवारक औषधे दिली जाणार आहेत.औषधांचा साठा देणारमहापुराचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जनावरांना दुग्धोत्पादनासाठी द्रवरूप कॅल्शियम, भूक वाढण्यासाठी लिव्हर टॉनिक व उष्माघातापासून संरक्षणासाठी उत्साहवर्धक औषधांचा साठा उपलब्ध केला जाणार आहे.