५५ वर्षांहून अधिक काळ रंगभूमीची सेवा; तळीराम पात्र बहारदारपणे साकारले
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 24, 2023 12:56 IST2023-07-24T12:24:52+5:302023-07-24T12:56:25+5:30
सच्चा रंगकर्मी म्हणून सावरकर यांची महाराष्ट्राला ओळख होती.

५५ वर्षांहून अधिक काळ रंगभूमीची सेवा; तळीराम पात्र बहारदारपणे साकारले
ठाणे : हिंदी मराठी चित्रपट सृष्टीत आपले अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचे आज निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ५५ हून अधिक वर्षे रंगभूमीवर काम केले. गडकरी यांच्या नाटकांपासून ते आजच्या घडीच्या नाटककारांपर्यंत त्यांनी भूमिका केल्या. तळीराम हे पात्र ते बहारदारपणे सादर करत, नवीन हिंदी सिनेमातही प्रेक्षकांनी त्यांना पाहिले आहे.
सच्चा रंगकर्मी म्हणून सावरकर यांची महाराष्ट्राला ओळख होती. त्यांना अण्णा म्हणून सर्व ओळखत. त्यांनी नाटक, हिंदी मराठी मालिका मध्येही काम केले आहे. ते नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. ते मूळचे गिरगावकर आणि नुकतेच ठाण्यात वास्तव्यास आले होते. त्यांचा जन्म ३ मे १९३६ चा असून मे २०२३ मध्ये अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.