शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे पुलाच्या मूळ बांधकामाचे नकाशेच नाहीत

By admin | Updated: September 11, 2016 02:05 IST

मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील सुमारे ५० वर्ष जुन्या वसई खाडीवर बांधलेल्या वरसावे पुलाच्या मूळ बांधकामाचे महत्वाचे नकाशेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे उपलब्ध

धीरज परब, मीरा रोडमुंबई- अहमदाबाद महामार्गावरील सुमारे ५० वर्ष जुन्या वसई खाडीवर बांधलेल्या वरसावे पुलाच्या मूळ बांधकामाचे महत्वाचे नकाशेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुळे पुलाच्या दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यास विलंब होत आहे. एकीकडे ४५ पोलीस व ३० ट्रॅफिक वॉर्डन गेल्या आठवड्यापासून बंदोबस्तास लागले असून अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबरपासून जुना पूल पूर्णपणे बंद करण्याची अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, प्राधिकरणाचे दिनेश अग्रवाल यांनीही मूळ नकाशे गॅमन इंडिया कंपनीकडून मागवले आहे. ते लवकरच उपलब्ध होतील असा दुजोरा दिला. वसई खाडीवरील या जुना पुलाचे भूमिपूजन १९६४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते झाले होते. जवळपास नऊ वर्षांनी पुलाचे काम पूर्ण झाले. १९७३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन झाले होते. या आधीही एका गर्डरला तडा गेल्याने डिसेंबर २०१३ ते जून २०१४ दरम्यान जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यावेळी अवजड वाहनांची वाहतूक भिवंडी, वाडा मार्गे वळवण्यात आली होती. तर नवीन पुलावरुन हलक्या वाहनांचीच वाहतूक होत असली तरीही कोंडी होऊन दोन तास लागत होते. गेल्या महिन्यात जुन्या पुलाच्या मध्यभागातील गर्डरला तडा गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना पत्र देऊन पुलाचा वापर तातडीने बंद करण्यास कळवले. जिल्हाधिकाऱ्यांनीही जुना पूल १५ सप्टेंबरपासून बंद करण्याची अधिसूचना जारी केली. गेल्या आठवड्यापासूनच वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना जुन्या पुलावरुन प्रवेश बंद करण्यास सुरुवात केली. शिवाय हलक्या वाहनांनाही २० किलोमीटरपेक्षा कमी वेगात पुलावरुन जाण्याची मर्यादा घातली. १५ सप्टेंबरपासून जुना पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने नवीन पुलावरुन मुंबई व गुजरातच्या दिशेने जाणारी वाहने सोडली जाणार आहेत.