पालिका रुग्णालयातील डायलेसिस यंत्रणा व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:50 PM2019-12-30T23:50:57+5:302019-12-30T23:51:23+5:30

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आठपैकी तीन डायलेसिस यंत्रं बंद

On the ventilator of a municipal hospital dialysis system | पालिका रुग्णालयातील डायलेसिस यंत्रणा व्हेंटिलेटरवर

पालिका रुग्णालयातील डायलेसिस यंत्रणा व्हेंटिलेटरवर

Next

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या मीरा रोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयातील डायलेसिसची सेवा व्हेंटिलेटरवर आहे. सर्वसामान्य रुग्णांना परवडणारी सेवा असूनही महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आठपैकी तीन डायलेसिस यंत्रं बंद पडलेली आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

२०१५ मध्ये मोठा गाजावाजा करत पालिका रुग्णालयात डायलेसिसच्या रुग्णांसाठी ही यंत्रे आणण्यात आली होती. परंतु, सदर यंत्रांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी तसेच नव्याने यंत्रखरेदीसाठी प्रशासनापासून स्थायी समिती आणि लोकप्रतिनिधींकडून दिरंगाई केली जात आहे. सध्या आठपैकी तीन डायलेसिस यंत्रे नादुरुस्त झाल्याने अनेक महिन्यांपासून बंद आहेत. तर, सुरू असलेल्या पाचपैकी काही यंत्रे तर एखाद्या रुग्णासाठी वापर होताच नंतर बंद पडतात.

डायलेसिस करण्यासाठी पालिकेचे दर परवडतात म्हणून रुग्ण मोठ्या आशेने येथे येत असतात. परंतु, पालिकेच्या गलथानपणामुळे डायलेसिस यंत्रं बंद तसेच नादुरुस्त झाल्याने येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनीदेखील याप्रकरणी पालिकेकडे तक्रार केली आहे. तीन यंत्रे बंद तर अन्य यंत्रेदेखील रामभरोसे असल्याने देखभाल दुरुस्ती आणि नवीन यंत्रखरेदी तातडीने करणे गरजेचे असताना सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाकडून आडमुठेपणा केला जात असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोप इनामदार यांनी केला आहे.

पालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी सांगितले की, बंद पडलेले तसेच नादुरुस्त यंत्र सुरू करण्यासाठी कंपनीच्या कर्मचाºयास बोलावले आहे. अंदाजपत्रकातही चार नवीन डायलेसिस यंत्रखरेदीच्या खर्चाला मंजुरी मिळालेली आहे. सर्वच यंत्रांच्या देखभाल दुरुस्तीचे वार्षिक कंत्राट दिले जाणार आहे.

Web Title: On the ventilator of a municipal hospital dialysis system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.