ठाण्यातील वाघबीळ येथील वाहने जाळणाऱ्यास अवघ्या दहा तासांमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 21:10 IST2019-08-07T21:04:21+5:302019-08-07T21:10:02+5:30

रोजगाराच्या शोधार्थ उत्तरप्रदेशातून ठाण्यात आलेल्या मोहम्मद सुनोवर सैय्यद (१९, रा. गोंडा, उत्तरप्रदेश) याने दारुच्या नशेतच पेट्रोल गळती असलेल्या दुचाकीजवळ काडी पेटी ओढली. त्यावेळी लागलेल्या आगीत अन्यही दोन मोटारसायकलींना आगी लागल्या. या प्रकारानंतर तिथून पळालेल्या सैय्यदला कासारवडवली पोलिसांनी अवघ्या दहा तासांमध्ये अटक केली.

Vehicles burnt in Thane accused arrested in just ten hours | ठाण्यातील वाघबीळ येथील वाहने जाळणाऱ्यास अवघ्या दहा तासांमध्ये अटक

दारुच्या नशेत कृत्य केल्याची दिली कबूली

ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कारवाईदारुच्या नशेत कृत्य केल्याची दिली कबूलीरोजगाराच्या शोधार्थ उत्तरप्रदेशातून आला ठाण्यात

ठाणे: दारुच्या नशेमध्ये वाघबीळ येथील वाहने जाळणा-या मोहम्मद सुनोवर अन्वर सैय्यद (१९, रा. गोंडा, उत्तरप्रदेश) याला कासारवडवली पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये मंगळवारी जेरबंद केले. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कासारवडवली, वाघबीळ येथील रहिवाशी प्रमोद तायडे यांनी ६ आॅगस्ट रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटारसायकल वाघबीळ उड्डाणपुलाखाली उभी करुन कामावर निघून गेले होते. ते दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास परतले तोपर्यंत त्यांच्या दुचाकीसह तिथूच बाजूला असलेल्या अन्य दोन मोटारसायकलींना अज्ञात व्यक्तीने आगी लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, पोलीस निरीक्षक प्रदीप उगले आणि सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी केलेल्या चौकशीतून सैय्यदचे नाव समोर आले. सय्यद कामाच्या शोधार्थ ५ आॅगस्ट रोजीच उत्तरप्रदेशातून ठाण्यात आला होता. वाघबीळ उड्डाणपूलाखाली तो बसलेला असतांना एका मोटारसायकलीचे पेट्रोल गळत असल्याचे त्याला दिसल्यानंतर त्याने काडी पेटवून ती दुचाकीतून पडणा-या पेट्रोलवर टाकली. त्याचवेळी त्या मोटारसायकलने पेट घेतला आणि बाजूच्या इतर दोन मोटारसायकलींनाही आगी लागल्या. दारुच्या नशेतच आपण हे कृत्य केल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. मोटारसायकलींनी पेट घेतल्यानंतर मात्र घाबरुन तिथून पळून गेल्याचेही त्याने मान्य केले. घटना घडली तेंव्हा एका कार चालकाने हा प्रकार पाहिला होता, त्यानेच एका पोलिसाला माहिती दिल्यानंतर सय्यदचे नाव उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: Vehicles burnt in Thane accused arrested in just ten hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.