शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर भाजीपाल्याचे दर उतरले; फळांचे भाव मात्र अद्याप चढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 00:33 IST

सर्वसामान्यांना काहीसा दिलासा । काेथिंबीर १० रुपये जुडी

ठाणे : जवळपास सगळ्याच भाज्या स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. लाल गाजराची आवक सुरू झाल्याने इंदूरच्या गाजराचे भाव कमी झाले आहेत. फळांचे भाव अद्याप कमी झालेले नाहीत. किराणाचे भाव मात्र स्थिर आहेत.

दिवाळीदरम्यान काही भाज्या स्वस्त झाल्या होत्या. काही भाज्या महागच होत्या. परंतु, या आठवड्यात जवळपास सर्वच भाज्यांचे दर कमी झाल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले. भाववाढीचे शतक गाठणारी कोथिंबीर आता १० रुपये प्रतिजुडी मिळत आहे. मेथी, शेपू, कोथिंबीर किरकोळमध्ये ५ ते १० रुपये जुडी, तर होलसेलमध्ये चांगल्या दर्जाच्या पालेभाज्या ५०० रुपयाला एक गोणी मिळत आहे. ८० ते १०० रुपये गाजर तर होलसेलमध्ये २०० रुपयांना अडीच किलो, फरसबी ४० रुपये किरकोळमध्ये तर होलसेलमध्ये ३२ रुपयांनी, किरकोळमध्ये फ्लॉवर ५० ते ६० रुपये किलो तर होलसेलमध्ये ३२ ते ४० रुपये किलाेने मिळत आहे.  फळांमध्ये  संत्री आणि कलिंगड वगळता  इतर फळे महागच असल्याचे फळविक्रेत्यांनी सांगितले.  

डाळींचे भाव स्थिर

तूरडाळ दिवाळीत होलसेलमध्ये ११० ते किरकोळमध्ये १२० रुपये किलो झाली होती. ते भाव अद्याप कायम आहेत. दिवाळीनंतर जवळपास सर्वच डाळींचे भाव स्थिर आहेत. तेलाचे भावही अद्याप चढेच असून इतर वस्तूंच्या भावातही किरकाेळ बदल झालेला आहे.

भाज्या महाग

१२० ते २०० रुपये किलो असलेली मटार आता ८० ते १०० रु. किलोने किरकोळ बाजारात, तर होलसेल बाजारात ७० रुपये किलोने तर ४० ते ५० रुपयांनी मिळणारी काकडी किरकोळमध्ये ३० रुपये किलो, तर होलसेलमध्ये २० ते २२ रुपये किलोने मिळत आहे. 

संत्री, कलिंगड स्वस्त

होलसेलमध्ये आठ डझन संत्री १००० ते १२०० रुपयांवरून ६०० ते ८०० रुपयांना मिळत आहे. किरकोळमध्ये १५० ते २०० रु. किलोने मिळत आहे. किरकोळमध्ये ४० रु. किलोने मिळणारे कलिंगड २५ रुपयांना मिळत आहे. 

टॅग्स :thaneठाणेfruitsफळे