शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वडवली उड्डाणपूल स्लो ट्रॅकवर

By admin | Updated: January 13, 2017 06:52 IST

आंबिवली रेल्वेस्थानकाजवळील वडवली आणि मोहने या भागांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम

कल्याण : आंबिवली रेल्वेस्थानकाजवळील वडवली आणि मोहने या भागांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सहा वर्षे रखडले आहे. रेल्वेच्या हद्दीतून जाणाऱ्या या उड्डाणपुलाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने वाहनचालकांना सध्या पूर्व-पश्चिमेला जाण्यासाठी येथील रेल्वे फाटकाजवळ तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. या पुलाच्या कामाच्या भूमिपूजनानंतर अन्य ठिकाणच्या पुलांची कामे मार्गी लागली असताना वडवली पुलाला सापत्न वागणूक का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.२०१० मध्ये तत्कालीन महापौर रमेश जाधव यांच्या कार्यकाळात या कामाचे भूमिपूजन झाले होते. हे काम तीन वर्षांत पूर्ण करावयाचे होते. परंतु, आजही हे काम अर्धवट आहे. पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी केडीएमसीकडून कोणत्याही हालचाली होत नाहीत. या पुलाचे काम सुरू केल्यानंतर अन्य उड्डाणपूल आणि स्कायवॉकची कामे हाती घेऊन ती पूर्णही झाली. परंतु, वडवली पुलाचे काम रखडलेल्या स्थितीत असल्याचे चित्र अनेक वर्षे पाहावयास मिळत आहे. या अपूर्ण राहिलेल्या कामामुळे आंबिवली रेल्वेलगत असलेल्या समांतर रस्त्याच्या नूतनीकरणाचे कामही पूर्णत: रखडले आहे. उड्डाणपूल नसल्याने येजा करणारी अवजड वाहने याच समांतर रस्त्यावरून जात असल्याने तेथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता दुरवस्थेच्या गर्तेत सापडला आहे. जागामालकाचे वाद असल्याने काही कालावधीसाठी पुलाच्या कामामध्ये व्यत्यय आला होता. मात्र, आता वादही संपुष्टात आल्याचे बोलले जाते. मग, कामाला प्रारंभ का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, यासंदर्भात लोकमतने बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद लाभला नाही. (प्रतिनिधी)