उत्तर प्रदेशात ५० हजारांचे बक्षीस असलेला दरोडेखोर ठाण्यातून जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 01:11 AM2021-06-08T01:11:00+5:302021-06-08T01:13:21+5:30

उत्तर प्रदेश (यूपी) राज्यातील आजमगढ जिल्हयात आपल्या साथीदारांसह दरोडा टाकून पसार झालेल्या उमर उर्फ उमर अहमद पुत्र अतीकुरहमान उर्फ अब्दुल रहमान शेख (३२, निजामाबाद, जिल्हा आजमगढ, उत्तरप्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक आणि यूपीच्या विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) पथकाने संयुक्त कारवाईत सोमवारी अटक केली.

In Uttar Pradesh, a robber with a bounty of Rs 50,000 was arrested from Thane | उत्तर प्रदेशात ५० हजारांचे बक्षीस असलेला दरोडेखोर ठाण्यातून जेरबंद

 सापळा रचून केली अटक

Next
ठळक मुद्देयूपीच्या एसटीएफसह ठाणे गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई सापळा रचून केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: उत्तर प्रदेश (यूपी) राज्यातील आजमगढ जिल्हयात आपल्या साथीदारांसह दरोडा टाकून पसार झालेल्या उमर उर्फ उमर अहमद पुत्र अतीकुरहमान उर्फ अब्दुल रहमान शेख (३२, निजामाबाद, जिल्हा आजमगढ, उत्तरप्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक आणि यूपीच्या विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) पथकाने संयुक्त कारवाईत सोमवारी अटक केली. त्याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी ५० हजारांचे बक्षीस ठेवले होते.
उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्हयातील फुलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१९ मध्ये शेख याने त्याच्या साथीदारांसह जबरी दरोडा टाकला होता. या घटनेतील मुख्य आरोपी उमर शेख हा मात्र गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याची माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस पोलिसांनी घोषित केले होते. हा दरोडेखोर ठाण्यात लपल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफला मिळाली होती. त्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे मदतीची मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला. तो ठाणे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून शेख याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, एपीआय जाधव तसेच एसटीएफचे उपनिरीक्षक शैलेंद्रकुमार आदींच्या पथकाने ठाणे स्थानक परिसरातून ६ जून रोजी ताब्यात घेतले. त्याला ७ जून रोजी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

Web Title: In Uttar Pradesh, a robber with a bounty of Rs 50,000 was arrested from Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.