शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:12 IST

करिअरमुळे इंग्रजीला अधिक महत्त्व : शब्द, व्याकरण समजणे जाते कठीण, शिक्षकांनी व्यक्त केली मते

- जान्हवी मौर्ये डोंबिवली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १४ सप्टेंबरला हिंदी दिनाचे औचित्य साधून ‘एक राष्ट्र एक भाषा’ याचे समर्थन केले होते. हिंदी भाषा देशाला एकसंध बांधून ठेवू शकते. परंतु, देशाचे भावी नागरिक असलेला युवा वर्ग आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिक्षण घेत आहे. इंग्रजी ही त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाची भाषा झाली आहे. त्यामुळे हिंदीचा अभ्यास करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी असून त्यांना या भाषेचे वावडे असल्याचे पाहायला मिळत आहे.चंद्रकांत पाटकर विद्यालयातील हिंदी विषयाच्या शिक्षिका कविता राऊत म्हणाल्या, मुले हिंदी भाषेत एकमेकांशी संवाद साधतात, चित्रपट पाहतात. पण, इतर विषयांपेक्षा हिंदी विषयात कमी गुण मिळतात. हिंदीच्या तुलनेत इतर विषयांत गुण चांगले मिळतात. हिंदी भाषा बोलणे आणि अभ्यास करणे यात फरक पडतो. शुद्ध भाषा त्यांना फार कमी ऐकायला मिळते. जे ऐकतात, तेच लिहितात. त्यामुळे त्यांचे गुण कमी होतात. विद्यार्थ्यांना करिअरसाठी इंग्रजी भाषा महत्त्वाची वाटते. त्यामुळे विद्यार्थी त्या विषयाला अधिक प्राधान्य देतात. हिंदीत जेवढे साहित्य उपलब्ध व्हायला हवे, ते होत नाही. अभियांत्रिकीचा अभ्यास इंग्रजीत आहे. त्यासाठी हिंदी किंवा मातृभाषेत साहित्य नाही. हे साहित्य उपलब्ध झाल्यास विद्यार्थी त्याकडे वळतील. हिंदी भाषाही रोजगार देऊ शकते. मात्र, त्या अंगाने त्याकडे पाहिले जात नाही. हिंदी भाषेत करिअर करण्यासाठी संधी कमी उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थी भाषेच्या कारणांमुळे मागे पडत आहे.पाटकर शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता तावडे म्हणाल्या, हिंदी भाषेचे महत्त्व मुलांना पटवून दिले नाही. हिंदीची शुद्ध भाषा कोणाला येत नाही. हिंदी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. चित्रपटातील हिंदी मुलांना चांगली येते. परदेशी भाषेचे फॅड आले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जा त्यांना मिळत असल्याने मुले त्या भाषांकडे वळतात. इयत्ता आठवीनंतर विद्यार्थी हिंदी भाषेकडे कमी वळतात. हिंदीची आवड असणारेच हिंदी घेतात. आपल्याकडे ३०० भाषा आहेत. त्यामुळे हिंदी राष्ट्रभाषा झाली पाहिजे. मुंबईत सर्व भाषिक एकत्र आले तरी त्यांच्याकडून जास्तीतजास्त हिंदी बोलली जाते. डॉन बॉस्को शाळेतील विद्यार्थी आरमन कपास म्हणाला, हिंदीत काना, मात्रा, वेलांटी असल्यामुळे मला शब्द नीट समजत नाहीत. त्यामुळे हिंदीचा अभ्यास करायला मला आवडत नाही. तर, मंथन सालियन याने सांगितले, हिंदी विषयाचा अभ्यास करायला मलाही कंटाळा येतो. त्यापेक्षा इंग्रजी विषय चांगला वाटतो. करिअरच्या दृष्टीने हिंदीला फारसा स्कोप नाही. ब्लॉसम स्कूलमधील विद्यार्थी अथर्व वाघ म्हणाला, हिंदीचे शुद्धलेखन समजत नाही. वर्णमाला आधी शिकलो आहे, तेव्हा पण शिक्षक जलदगतीने शिकवत असल्याने आता ही हिंदीचा विषय परिपक्व झाला नाही. गार्डियन स्कूलमधील श्रेया सडेकर यांच्या मते, हिंदीतील शब्दांचे अर्थ समजायला कठीण जातात. हिंदीचे वाचन फारसे होत नाही. त्यामुळे लिहितानाही त्रास होतो.साहित्य कधी वाचणार?पालक प्राजक्ता सडेकर म्हणाल्या, शाळेकडून हिंदीपेक्षा इंग्रजी विषयाकडे जास्त भर दिला जातो. आमच्या काळात विविध स्पर्धा होत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी निर्माण होत होती. आता तसे होत नाही. मुले आताच शालेय पातळीवर हिंदी वाचत नाही तर साहित्याचा अभ्यास कधी करणार.

टॅग्स :hindiहिंदीSchoolशाळाStudentविद्यार्थी