शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत उर्दू घर स्थापन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी - भिवंडी शहराची लोकसंख्या अंदाजे पंधरा लाख इतकी असून, शहरात सुमारे ५६ टक्के मुस्लीम समाज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी - भिवंडी शहराची लोकसंख्या अंदाजे पंधरा लाख इतकी असून, शहरात सुमारे ५६ टक्के मुस्लीम समाज आहे. मुस्लीम बांधवांची मातृभाषा ही उर्दू आहे. मात्र, शहरात उर्दू भाषेचे भव्य असे उर्दू घर नसल्याने उर्दू भाषिक विद्यार्थ्यांसह नागरिकांना शैक्षणिक व सांस्कृतिक अडचणी येतात. त्यामु‌ळे भिवंडीत भव्य असे उर्दू घर स्थापन करण्यात यावे, अशी मागणी भिवंडी पूर्वचे समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे अल्पसंख्याक विकास व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .

भिवंडी शहरात महानगरपालिकेअंतर्गत उर्दू भाषेतील ७० हून अधिक प्राथमिक शाळा उपलब्ध असून, खासगी संस्थांद्वारे ३० माध्यमिक शाळा उर्दू आहेत; तर ७ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये आहेत. पदवी व पदव्युत्तर शिक्षणाकरिता भिवंडीतील हजारो विद्यार्थी उर्दू भाषा निवडतात. पदव्युत्तर शिक्षण आणि पदवी शिक्षणाकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक तसेच मौलाना आझाद नॅशनल विश्वविद्यालय हैदराबाद अशा मुक्त विद्यापीठांद्वारे देखील भिवंडीतील हजारो विद्यार्थी उर्दू भाषेची निवड करून त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. दरवर्षी भिवंडीत जवळपास पाच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी दहावी तर दोन हजारांहून अधिक विद्यार्थी बारावीचे शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यामुळे भिवंडीतून वार्षिक सरासरी २५ ते ३० हजार विद्यार्थी उर्दू भाषेतून शिक्षण घेत असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या निदर्शनास आणून दिली.

राज्य शासनामार्फत एकूण सहा शहरांमध्ये उर्दू घर प्रस्तावित आहेत. राज्यात नांदेड, सोलापूर, औरंगाबाद, मुंबई आणि मालेगाव या शहरांमध्ये प्रशस्त उर्दू घरांना शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, शासनाद्वारे उर्दू घराचा प्रस्ताव सादर व मंजूर करताना भिवंडी शहराचा त्यामध्ये उल्लेख केला गेला नाही. ठाणे जिल्ह्यातील उर्दू भाषिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या भिवंडी शहराचा यामध्ये उल्लेख झाल्यास त्याचा फायदा भिवंडीसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, शहापूर इत्यादी आजूबाजूच्या परिसरातील उर्दू भाषिकांना होणार आहे. त्यामुळे राज्य शासनास भिवंडी शहराकरिता उर्दू घर स्थापन करण्यास निधीच्या उपलब्धतेबाबत अडचण असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ५० लाख रुपये उपलब्ध करण्यास माझी तयारी असल्याची ग्वाही देखील आमदार शेख यांनी मंत्री मलिक यांना दिलेल्या लेखी निवेदनात दिली आहे.