ठाण्यात होणार पुरंदरेंचा नागरी सत्कार

By Admin | Updated: August 21, 2015 00:58 IST2015-08-21T00:58:54+5:302015-08-21T00:58:54+5:30

ठाणे महापालिकेनेदेखील बाबासाहेब पुरंदरे यांचा नागरी सत्कार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Urban hospitality of Purandar will be held in Thane | ठाण्यात होणार पुरंदरेंचा नागरी सत्कार

ठाण्यात होणार पुरंदरेंचा नागरी सत्कार

घोडबंदर : ठाणे महापालिकेनेदेखील बाबासाहेब पुरंदरे यांचा नागरी सत्कार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रस्ताव शिवसेना व भाजपाने मांडून बहुमताच्या जोरावर मंजूर केला आहे. प्रशासनाकडून प्रस्ताव आला नसताना हा ठराव करणे योग्य नसल्यामुळे त्याला लोकशाही आघाडीने विरोध केला आहे. त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. गुरु वारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बाबासाहेब पुरंदरे यांचा नागरी सत्कार करण्यासंबंधी शिवसेना-भाजपाच्या प्रस्तावास काँग्रेस -राष्ट्रवादीने कडाडून विरोध केल्याने हा वाद वाढण्याची शक्यता आहे. स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, शिवसेनेचे गटनेते संतोष वडवले, भाजपाचे गटनेते संजय वाघुले, नगरसेवक मुकेश मोकाशी यांनी प्रस्तावाची सूचना मांडली
होती. (वार्ताहर)

Web Title: Urban hospitality of Purandar will be held in Thane