शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

ठाण्यात दिव्यांग तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

By जितेंद्र कालेकर | Published: November 18, 2019 10:06 PM

मानसिकरित्या विकलांग असलेल्या २२ वर्षीय तरुणावर कळवा येथील एका सलूनमधील मोनू शर्मा याने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी शर्माविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देठार मारण्याचीही दिली धमकी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल परराज्यात पळाल्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कळव्यातील भास्करनगर येथील एका सलूनच्या दुकानात २२ वर्षीय तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणा-या मोनू शर्मा (२४, रा. भास्करनगर, कळवा) याच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अत्याचाराच्या प्रकारानंतर तो पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.मोनू याने १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास आपल्या सलूनच्या दुकानात दिव्यांग असलेल्या या २२ वर्षीय तरुणाला बोलविले. तिथे दुकानाचे शटर बंद करून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. तसेच या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता केल्यास त्याला ठार मारण्याचीही धमकी दिल्याचे या तरुणाने त्याच्या पालकांना सांगितले. या प्रकाराची खात्री करण्यासाठी शर्माला पीडित तरुणाच्या पालकांनी जाब विचारला. तेव्हा त्याने या प्रकाराचा इन्कार करून त्याचे वडील आणि भावालाही धमकी दिली. पोलीस ठाण्यात तक्रार केली तरी आपण घाबरत नसल्याचे सांगून त्यांना पुन्हा आल्यास बघून घेण्याचीही त्याने पुन्हा धमकी दिली. या प्रकारानंतर भेदरलेल्या या कुटुंबाने १७ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विलास कदम याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार