ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात अज्ञात तरुणाच्या खुनाने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:17 IST2018-05-04T22:17:12+5:302018-05-04T22:17:12+5:30

वागळे इस्टेट भागात एका तरुणाचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत एका गोणीतून टाकण्यात आल्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली. हा खून कोणी आणि का केला याचा तपास पोलीस करीत आहेत.

Unknown man murdered in Thane's Wagle estate area | ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात अज्ञात तरुणाच्या खुनाने खळबळ

बांधलेल्या अवस्थेत गोणीमध्ये मिळाला मृतदेह

ठळक मुद्देबांधलेल्या अवस्थेत गोणीमध्ये मिळाला मृतदेहतोंडावर गरम पाणी टाकल्याचा संशयमृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु

ठाणे : एका ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याचे प्रेत एका गोणीत भरून ते वागळे इस्टेट भागातील एका बंद कंपनीच्या मागील बाजूला टाकल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वागळे इस्टेट रोड क्रमांक २१ येथील बुश कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या निर्जनस्थळी एका गोणीत अनोळखी तरुणाचा मृतदेह वागळे इस्टेट पोलिसांना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मिळाला. या गोणीतून रक्त येत असल्याची माहिती पोलिसांना स्थानिकांनी दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. हे पोते उघडल्यानंतर या तरुणाचे प्रेत हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते. त्याची ओळख पटू नये, म्हणून तोंडावर गरम पाणी ओतल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यात येत असून हत्या कोणी आणि का केली, याचाही तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी सांगितले. या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रणही तपासण्यात येत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, हा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवचिच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतर यावर अधिक माहिती मिळू शकेल, असे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.

Web Title: Unknown man murdered in Thane's Wagle estate area