युवासेनेच्या सचिवांना आमदार वडिलांकडून वाढदिवसाला अनोखी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:37 IST2019-12-29T02:35:31+5:302019-12-29T06:37:16+5:30

बछडा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणिसंग्रहालयात राहणार

Unique birthday gift from MLA father to Youth Secretary | युवासेनेच्या सचिवांना आमदार वडिलांकडून वाढदिवसाला अनोखी भेट

युवासेनेच्या सचिवांना आमदार वडिलांकडून वाढदिवसाला अनोखी भेट

शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव असलेल्या पूर्वेश यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे वडील प्रताप सरनाईक यांनी बिबट्याचा बछडा वनविभागाकडून दत्तक घेत चिरंजीव पूर्वेश यांना शनिवारी भेट दिला. या बछड्याचे ‘बिट्टू बॉस’ असे नामकरण केले आहे. हा बछडा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणिसंग्रहालयात राहणार आहे. माझी पत्नी ही त्याठिकाणी मॉर्निंगवॉकला गेली असता तिला बिबट्याच्या बछड्याचा ओरडण्याचा आवाज आला. तेथील नागरिकांनी त्वरीत वनविभागाकडे संपर्क साधून बछड्याला अधिकाऱ्यांनी ताब्यात दिले.

तेव्हा मनात एक विचार आला की, आपल्याच मतदार संघात बिबट्याचा बछडा आढळून आला आहे. त्याचे संगोपन करण्याची जबाबदारीसुद्धा आपली आहे. मग आम्ही लगेच वनविभागाची संपर्क साधून बछड्याविषयी अधिक माहिती घेऊन त्याला दत्तक घेण्याचा विचार केला.

Web Title: Unique birthday gift from MLA father to Youth Secretary