शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीवरील हरकती संपल्या तरी निवडणुकीबाबत अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. प्रारूप मतदारयादीवरील हरकत घेण्याची ...

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. प्रारूप मतदारयादीवरील हरकत घेण्याची मुदत सोमवारी संपली असली तरी निवडणुकीबाबत अनिश्चितता कायम राहिली आहे. कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढत असल्याने नेमक्या निवडणुका होणार कधी हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रारूप मतदारयादीवर हरकत घेण्याची २२ फेब्रुवारी ही शेवटची तारीख होती. सोमवारी हरकतीच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी हरकतींसाठी लांबच लांब रांग लावली होती. शेकडोंच्या संख्येने हरकती आल्या असून, मतदारयादीत प्रचंड प्रमाणात घोळ असल्याचे समोर आले आहे. प्रभागनिहाय यादी तयार करताना अनेक मतदार हे वाॅर्डाच्या बाहेर फेकले गेल्याचेही समोर आले आहे. मतदारयादीवरील हरकती संपल्यावर आता त्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. हे सर्व सुरू असतानाच आता निवडणुका पुढे जाणार, अशी चर्चादेखील सुरू झाली आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनची चर्चा रंगत आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. राज्य शासन निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार यावरच अंबरनाथ आणि बदलापूरच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

मतदारयादीचे काम सुरू असतानाच निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे पालिकेची निवडणूक मार्च महिन्याच्या शेवटच्या किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता होती. मात्र, कोरोनाचे संकट पाहता या निवडणुकीबाबत शासन निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

------------------------------------------