उल्हासनगरात आज नवे १४८ रुग्ण, एकून संख्या १९१४ तर ४ जणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 20:51 IST2020-06-30T20:51:25+5:302020-06-30T20:51:34+5:30
उल्हासनगरात मंगळवारी तब्बल १४८ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णाची संख्या १९१४ झाली.

उल्हासनगरात आज नवे १४८ रुग्ण, एकून संख्या १९१४ तर ४ जणाचा मृत्यू
उल्हासनगर : उल्हासनगरात आज नवे १४८ कोरोना रुग्ण आढळून आली असून एकूण रुग्णाची संख्या १९१४ झाली आहे. तर चार रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत १०४३ रुग्ण कोरोना मुक्त झाले तर ८२४ जनावर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मोहनालकर यांनी दिली.
उल्हासनगरात मंगळवारी तब्बल १४८ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णाची संख्या १९१४ झाली. त्यापैकी आज पर्यंत १०४३ जण कोरोना मुक्त झाले. तर ८२४ रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. ४ जणाचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या ४७ झाली. शहरातील कॅम्प नं -१ मध्ये - २१, कॅम्प नं-२ मध्ये -१८, कॅम्प नं -३ मध्ये -३८, कॅम्प नं -४ मध्ये -५३ तर कॅम्प नं -५ मध्ये १८ असे एकूण १४८ नवे रुग्ण आढळून आले.
शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून शहर पूर्वेतील गुरुनानक शाळा परिसर, कुर्ला कॅम्प नवे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. रुग्णाच्या वाढत्या संख्येने महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले असून रुग्णांना ठेवायचे कुठे? अशा प्रश्न महापालिका प्रशासन समोर पडला आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी शहरातील कोविड रुग्णालयाची पाहणी केली असून पर्यायी रुग्णालय जागेच्या शोधात आहेत