Ulhasnagar: तडीपार गुंडाचा तलवार घेऊन धिंगाणा 

By सदानंद नाईक | Updated: August 29, 2023 17:27 IST2023-08-29T17:27:33+5:302023-08-29T17:27:56+5:30

Ulhasnagar: कॅम्प नं-५, महात्मा फुलेनगर मध्ये राहणाऱ्या तडीपार गुंडाने सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजता तलवार नाचवत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला तलवारसह जेरबंद करून अटक केली.

Ulhasnagar: Tadipar goon attacked with sword | Ulhasnagar: तडीपार गुंडाचा तलवार घेऊन धिंगाणा 

Ulhasnagar: तडीपार गुंडाचा तलवार घेऊन धिंगाणा 

- सदानंद नाईक
 उल्हासनगर - कॅम्प नं-५, महात्मा फुलेनगर मध्ये राहणाऱ्या तडीपार गुंडाने सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजता तलवार नाचवत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला तलवारसह जेरबंद करून अटक केली.

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात राहणाऱ्या साहिल नरेंद्र गायसमुद्रे याच्यावर ठाणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगरे व रायगड जिल्ह्यातील पनवेल व कर्जत तालुक्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. मात्र सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान प्रेमनगर टेकडी महात्मा फुलेनगर येथे तलवार घेऊन परिसरात साहिल हा दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी हिललाईन पोलिसांनी त्याला तलवारीसह अटक करून गुन्हा दाखल केला. शहरातून तडीपार केलेल्या गुंडाचा ठावठिकाणा शहरातील विविध विभागात सापडत असल्याने, पोलिसांच्या तडीपार करवाईवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत

Web Title: Ulhasnagar: Tadipar goon attacked with sword