शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप

By सदानंद नाईक | Updated: December 25, 2025 20:05 IST

Ulhasnagar Municipal Election: पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला

Ulhasnagar Municipal Election: सदानंद नाईक, उल्हासनगर: उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी भाजपात प्रवेश घेतल्याची संधी साधून शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, किरण सोनावणे यांनी शिवसैनिकांसह श्रीरामनगर शिवसेना शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला उद्धवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

उल्हासनगर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी बुधवारी दुपारी भाजपाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात समर्थकासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी भाजपचे आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रदीप रामचंदानी, अमर लुंड आदी जण उपस्थित होते. बोडारे यांनी भाजपात प्रवेश केल्याची संधी साधून बुधवारी सायंकाळी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण अशांन यांनी पक्ष पदाधिकारी व शिवसैनिकासह कॅम्प नं-४ मधील उद्धवसेनेची श्रीरामनगर शिवसेना शाखेचा कब्जा घेतला. यावेळी अतिउत्साही शिवसैनिकांनी शाखेतील उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे फोटो कपड्याने झाकून पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवला.

श्रीरामनगर शाखेवर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कब्जा घेतल्याची माहिती उद्धवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना समजल्यावर त्यांनी शाखेत धाव घेतली. यावेळी तणाव निर्माण होऊन घोषणाबाजी झाली. वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने, पुढील अनर्थ टळला. शाखेचा प्रश्न दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून सोडविण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माघार घेतल्याने, तणाव मावळला असून शाखा ताब्यात घेण्यावरून भविष्यात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar: Shiv Sena Factions Clash Over Branch; Police Intervene

Web Summary : Tension arose in Ulhasnagar as Shinde Sena tried to seize a Shiv Sena branch after a leader defected to BJP. Police intervention prevented escalation. Future conflict looms.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा