Ulhasnagar: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा, उल्हासनगरात खाजगी बसखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू

By सदानंद नाईक | Updated: August 26, 2023 16:55 IST2023-08-26T16:54:47+5:302023-08-26T16:55:19+5:30

Ulhasnagar: कॅम्प नं-३, सी ब्लॉक रस्त्यावर शुक्रवारी रात्री १० वाजता रस्त्यातील खड्डा चुकविण्याच्या नादात मोटरसायकल खाली पडून तरुण भरधाव खाजगी बसच्या मागच्या चाकात चिरडला गेला.

Ulhasnagar: Road pothole turns fatal, youth dies on the spot after being crushed under a private bus in Ulhasnagar | Ulhasnagar: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा, उल्हासनगरात खाजगी बसखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू

Ulhasnagar: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा, उल्हासनगरात खाजगी बसखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू

- सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-३, सी ब्लॉक रस्त्यावर शुक्रवारी रात्री १० वाजता रस्त्यातील खड्डा चुकविण्याच्या नादात मोटरसायकल खाली पडून तरुण भरधाव खाजगी बसच्या मागच्या चाकात चिरडला गेला. द्रविड मिश्रा नावाच्या तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर चोपडा कोर्ट मार्गे सी ब्लॉक रस्त्याने द्रविड मिश्रा एका मित्रांसह शुक्रवारी रात्री १० वाजता जात होता. डॉ आंबेडकर प्रवेशद्वारच्या पुढे मोटरसायकल खड्ड्यातून वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असतांना मोटरसायकल स्लिप होऊन खाली पडली. यामध्ये द्रविड मिश्रा हा भरधाव येणाऱ्या खाजगी बसच्या मागच्या चाका खाली आला. यामध्ये त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मध्यवर्ती पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठविला. तसेच खाजगी बस ताब्यात घेऊन फरार झालेल्या बस चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

मृत झालेला तरुण शहाड फाटक परिसरातील असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आतातरी रस्त्यातील खड्डे भरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. तसेच याप्रकरणी बस मालकाला नोटीस दिली असून अधिक तपास पोलीस करीत असल्याचे कड म्हणाले

Web Title: Ulhasnagar: Road pothole turns fatal, youth dies on the spot after being crushed under a private bus in Ulhasnagar