उल्हासनगर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, २३३ वाहनाची तपासणी करून दंडात्मक कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:39 IST2025-07-29T16:38:50+5:302025-07-29T16:39:14+5:30

Ulhasnagar Police News: पोलीस परिमंडळ क्रं-४ च्या पोलिसांनी रविवारी ऑपरेशन ऑल आउट राबवून २३३ वाहनाची विविध ठिकाणी तपासणी करून दंडात्मक कारवाई केली. तसेच तडीपार, दारूबंदी, लॉज, बिअरबार, जुगार आदी अवैध धंदयावर कारवाई करून ५ जणांला अटक केली. असी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

Ulhasnagar Police combing operation, 233 vehicles inspected and penal action taken | उल्हासनगर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, २३३ वाहनाची तपासणी करून दंडात्मक कारवाई 

उल्हासनगर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, २३३ वाहनाची तपासणी करून दंडात्मक कारवाई 

- सदानंद नाईक 
उल्हासनगर - पोलीस परिमंडळ क्रं-४ च्या पोलिसांनी रविवारी ऑपरेशन ऑल आउट राबवून २३३ वाहनाची विविध ठिकाणी तपासणी करून दंडात्मक कारवाई केली. तसेच तडीपार, दारूबंदी, लॉज, बिअरबार, जुगार आदी अवैध धंदयावर कारवाई करून ५ जणांला अटक केली. असी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

उल्हासनगर पोलीस परिमंडळात कायदा व सुव्यवस्था साबूत ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी रविवारी रात्री ऑपरेशन ऑल आऊट राबविले. या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये ४२ अधिकारी व २४१ पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली विविध पोलीस पथकाने गुन्हेगारी अड्ड्यांवर वैयक्तिकरित्या कोम्बिंग ऑपरेशन राबवून ५९ लॉज व बार तपासणी केली. दारूबंदीचे १०, जुगाराची ६, अंमली पदार्थाचे सेवन ५, कोप्टा (तंबाखू) प्रकरणे ४१ तसेच ८ जणांना पोलिसांनी वॉरंट बजावले. तर एमपी कायदा अंतर्गत एकाला अटक केली. कोम्बिंग ऑपरेशन मध्ये एकूण १०८ गुंड, परप्रांतीय व्यक्तीला तपासून ६७ जणांना सूचना देऊन सोडून दिले. कोम्बिंग मध्ये ५ जणांना अटक केली.

पोलीस परिमंडळाच्या विविध ८ नाकाबंदी ठिकाणी एकूण २३३ वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्यांच्याकडून ८४ हजार २५० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी देऊन असे कोम्बिंग ऑपरेशन यापुढेही राबविण्यात येणार असल्याचे संकेत गोरे यांनी दिले आहे.

Web Title: Ulhasnagar Police combing operation, 233 vehicles inspected and penal action taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.