महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्षांचा दौरा, उल्हासनगर महापालिका सफाई कामगारांची रिक्त पदे भरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:54 IST2025-06-27T18:54:05+5:302025-06-27T18:54:30+5:30
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शरसींग रुक्कनतसिंग थग्गर यांनी महापालिका सफाई कामगारांच्या समस्या समजून घेऊन, आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या सोबत चर्चा केली.

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्षांचा दौरा, उल्हासनगर महापालिका सफाई कामगारांची रिक्त पदे भरणार
उल्हासनगर : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शरसींग रुक्कनतसिंग थग्गर यांनी महापालिका सफाई कामगारांच्या समस्या समजून घेऊन, आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या सोबत चर्चा केली. बहुतांश मागण्या आयुक्तानी मान्य करीत ५६ रिक्त सफाई कामगारांचे पदे तीन महिन्यात भरण्याचे आश्वासन आयुक्तानी दिल्याचे थग्गर म्हणाले.
उल्हासनगर महापालिका सफाई कामगारांच्या समस्या समजून घेऊन, त्या सोडविण्यासाठी व शासनाने दिलेल्या सुविधा मिळतात की नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शरसींग रुक्कनतसिंग थग्गर यांनी शुक्रवारी महापालिकेचा दौरा केला. त्यांनी सफाई कामगार, कामगार नेते, आयुक्त मनिषा आव्हाळे व अन्य अधिकाऱ्या सोबत चर्चा केली. ज्या सफाई कामगारांची २५ वर्षे सेवा झाली, त्यांना श्रमसाफल्य योजने अंतर्गत मोफत घर देण्याचे महापालिकेने मान्य केले. तसेच सफाई कामगार ज्या महापालिका निवासात राहतात. त्यांचे भाडे कमी करणे, लाड-पागे समितीची अंमलबजावणी करणे, आरोग्यासाठी कॅशलेस १० लाखाचे कार्ड देणे, शासनाचे सार्वजनिक सुट्टी व साप्ताहिक सुट्टी लागू करणे, दिव्यांग कामगारांना त्यांच्या दिव्यांगाच्या प्रमाणात काम देणे, शिक्षित सफाई कामगारांना पदोन्नती देणे आदी आयोगाच्या मागण्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मान्य केल्या.
महापालिकासह सर्वच ठिकाणी कंत्राटी कामगार पद्धती लागू झाली. शासन नियमानुसार किमान वेतनावर सफाई कामगारांसह अन्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर महापालिका घेत आहे. सफाई कामगार पुरविण्यासाठी महापालिकेच्या एखाद्या सफाई कामगारांलाच ठेका मिळावा. असेही आयोगाचे अध्यक्ष थग्गर म्हणाले. एक प्रकारे थग्गर यांनी कंत्राटी कामगार पद्धतीचे स्वागत केले. पदोन्नती, भरती, आदिचेही आदेश आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी देऊन तीन महिन्यानंतर झालेल्या महापालिका कारभारा आढावा घेण्यासाठी महापालिकेत येणार असल्याचे संकेत दिले. तसेच रिक्त ५६ सफाई कामगार भरण्याचे निर्देश दिल्यावर, आयुक्तानी तीन महिन्यात पदे भरण्याचे आश्वासन दिले. यावेळी आयुक्त मनिषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, कामगार नेते चरणसिंग टाक, राजेंद्र अंडागळे आदि जण उपस्थित होते.
माहिती अधिकाऱ्याने हैराण
गेल्या काही महिन्यापासून महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद आदिना भेटी देऊन सफाई कामगारांच्या समस्या सोडवित आहे. मात्र मी जास्त फिरतो, म्हणून माझी माहिती अधिकाऱ्या खाली अनेकांनी माहिती मागितली. असी खंत थग्गर यांनी व्यक्त केली.