उल्हासनगर महापालिकेकडून महिला बचत गटांना स्टॉलचा ताबा मिळेना, स्टॉल लागले गंजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 22:20 IST2026-02-09T22:20:30+5:302026-02-09T22:20:46+5:30
...मात्र गेल्या अनेक महिन्यापासून स्टॉलचा ताबा दिला जात नसल्याने, स्टॉलला गंज लागण्यास सुरवात झाली आहे.

उल्हासनगर महापालिकेकडून महिला बचत गटांना स्टॉलचा ताबा मिळेना, स्टॉल लागले गंजू
उल्हासनगर : महापालिकेने लॉटरी पद्धतीने महिला बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी लोखंडी स्टॉलचे वाटप केले. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून स्टॉलचा ताबा दिला जात नसल्याने, स्टॉलला गंज लागण्यास सुरवात झाली आहे.
उल्हासनगर महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने, महिला बचत गट सक्षम व्हाव्यात यासाठी ५० लोखंडी स्टॉल व्यवसाया निमित्त देण्याचे ठरले. मात्र गेल्या सव्वा वर्षापासून स्टॉल वाटप होत नसल्याने, महिलांनी आंदोलन केले. त्यानंतर आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आदेशाने स्टॉलची लॉटरी पद्धतीने सोडत काढून वाटप करण्यात आले. ज्या महिला बचत गटांना स्टॉलची लॉटरी लागली. त्यांच्याकडून ऐक अग्रीमेंट मालमत्ता विभाग लिहून घेणार आहे.
मात्र या अग्रीमेंट लिहून घेण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी उलटला आहे. तर दुसरीकडे वापरा विना लोखंडी स्टॉलला गंज लागण्यास सुरवात झाली. महापालिकेच्या या कारभाराबाबत शहरांत संताप व्यक्त होत आहे. ५० गटांना लाभ महापालिका अंतर्गत एकूण ५० महिला बचत गटांना स्टॉलचे वाटप लॉटरी पद्धतीने गेल्या सहा महिन्यापूर्वी करूनही स्टॉलचा ताबा महिला बचत गटांना दिला नाही. या स्टॉलमुळे गरीब व गरजू महिला बचत गटांना कायदेशीररित्या व्यवसाय करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळणार आहे.