उल्हासनगर महापालिका ठेकेदाराला टोळक्याकडून मारहाण, रस्ता बांधणीवरून वाद

By सदानंद नाईक | Updated: April 17, 2024 22:42 IST2024-04-17T22:42:27+5:302024-04-17T22:42:50+5:30

सदानंद नाईक  उल्हासनगर : कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प रोड सेंट्रल पार्क हॉटेल समोरील रस्त्याच्या पाहणीवेळी एका टोळक्याने, बुधवारी सायंकाळी ...

Ulhasnagar municipal contractor beaten up by gang, dispute over road construction | उल्हासनगर महापालिका ठेकेदाराला टोळक्याकडून मारहाण, रस्ता बांधणीवरून वाद

उल्हासनगर महापालिका ठेकेदाराला टोळक्याकडून मारहाण, रस्ता बांधणीवरून वाद

सदानंद नाईक
 उल्हासनगर : कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प रोड सेंट्रल पार्क हॉटेल समोरील रस्त्याच्या पाहणीवेळी एका टोळक्याने, बुधवारी सायंकाळी ५ वाजता ठेकेदार विशाल माखिजानी यांना मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत जखमी झालेल्या माखीजा यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-४ कुर्ला कॅम्प रस्ता सेंट्रल हॉटेल समोरील रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजता रस्त्याची पाहणी साठी गेलेले ठेकेदार विशाल माखिजा यांची काही जणां सोबत तू तू मैं झाली. तेंव्हा एका टोळक्याने त्याच्यावर हल्ला केल्याचे बोलले जाते. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.

यामध्ये एक ठेकेदार जखमी झाल्याचे पडवळ म्हणाले. शहरात रस्ता पुनर्बांधणी व भुयारी गटारीचे काम सुरू असून खोदलेल्या रस्त्यामुळे धुळीच्या प्रमाणात वाढ झाली. तसेच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Ulhasnagar municipal contractor beaten up by gang, dispute over road construction