- सदानंद नाईक, उल्हासनगरUlhasnagar Crime News: सार्वजनिक शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलावर अत्याचार करणाऱ्या नराधम अमित कोतपिल्ले याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. गुरुवारी (१५ मे) दुपारी हा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर आई-वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाणे अंतर्गत राहणारा गावगुंड अमित कोतपिल्ले हा नुकताच एका गंभीर गुन्ह्यातून कारागृहाबाहेर आला होता.
मुलाला जीवे मारण्याची धमकी
गुरुवारी दुपारी एक अल्पवयीन मुलगा सार्वजनिक शौचालयात गेल्यावर त्याचा पाठलाग आरोपी कोतपिल्ले याने केला. मुलाला ठार मारण्याची धमकी देत त्याने मुलाला शौचालयात नेले.
वाचा >>नागपूरची महिला कर्गिलमध्ये गायब; १५ वर्षांचा मुलगा हॉटेलमध्ये सापडला एकटा !
शौचालयात नेऊन त्याने मुलावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेने मुलगा हादरला. घाबरलेल्या व रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलाने घर गाठून झालेला प्रकार आईला सांगितला. या प्रकाराने घाबरलेल्या आई-वडिलांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून मुलासोबत झालेला प्रकार पोलिसांना सांगितला.
मुलावर उपचार सुरू
घटनेचे गांभीर्य ओळखून मध्यवर्ती पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तर मुलावर रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे.
आरोपी अमित कोतपिल्ले याची गेल्याच आठवड्यात कारागृहातून जामिनावर सुटका झाली. यापूर्वी त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून शुक्रवारी त्याला या गुन्हा प्रकरणी कल्याण येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला कडक शिक्षा होण्याची मागणी शहरवासीयाकडून होत आहे.