उल्हासनगर भाजपचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन, पोलिसांची धरपकड
By सदानंद नाईक | Updated: February 6, 2023 20:14 IST2023-02-06T20:14:29+5:302023-02-06T20:14:37+5:30
भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्ता रोखो करून आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

उल्हासनगर भाजपचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन, पोलिसांची धरपकड
उल्हासनगर : महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ भाजपने सोमवारी आंदोलन केले. उल्हासनगर पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांची धडपकड करून सोडून देण्यात आले.
उल्हासनगर भाजपाचे शहराध्यक्ष जमूनदास पुरस्वानी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अपशब्द काढल्याच्या निषधार्थ आंदोलन केले. आंदोलनात युवा मोर्चाचा सहभाग होता. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्ता रोखो करून आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी अनेकांची धडपकड करून नंतर सोडून देण्यात आले. आंदोलनात प्रदीप रामचंदानी, दिपक छटवानी, मनोहर खेमचंदानी, महेश सुखरामनी, राजेश वधारीया यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.