उल्हासनगर : दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीला भोकसले, पती विरोधात गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: July 9, 2024 15:58 IST2024-07-09T15:58:16+5:302024-07-09T15:58:43+5:30

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पत्नी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. 

 Ulhasnagar A case has been registered against the wife for not paying for drinking alcohol |  उल्हासनगर : दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीला भोकसले, पती विरोधात गुन्हा दाखल

 उल्हासनगर : दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीला भोकसले, पती विरोधात गुन्हा दाखल

उल्हासनगर : दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून पतीने भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीला भोकसल्याची घटना चिंचपाडा येथे ६ जून रोजी घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पत्नी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. 

उल्हासनगर शेजारील लक्ष्मीनगर चिंचपाडा येथे रेखा नागेश माघाडे ह्या कुटुंबासह राहतात. ६ जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजता रेखा घरात भाजीपाला कापत होत्या. त्यावेळी पती नागेश तेथे येऊन दारूच्या पैशासाठी तगादा लावला. मात्र दारू पिण्यास पैसे देण्यास रेखा यांनी नकार देतात, संतापलेल्या नागेशने सुरवातीला शिवीगाळ व मारहाण केली.

त्यानंतर भाजी कापण्याचा चाकू रेखाच्या पोटात भोकासला. जखमी रेखा माघाडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून रेखा यांचा भाऊ दत्तू हरळीकर यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नागेश माघाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत असून रेखा मात्र मृत्यूशी झुंज देत आहे

Web Title:  Ulhasnagar A case has been registered against the wife for not paying for drinking alcohol