शाखा तोडली, बॅनर फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडू; उद्धव ठाकरे मुंब्र्यात कडाडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 19:30 IST2023-11-11T19:29:01+5:302023-11-11T19:30:07+5:30

मुंब्र्यात शिवसेनेची शाखा पाडण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटातील वातावरण तापलेलं असताना आज उद्धव ठाकरे थेट मुंब्र्यात पोहोचले.

Uddhav Thackeray attacks on cm shinde in Mumbra speech | शाखा तोडली, बॅनर फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडू; उद्धव ठाकरे मुंब्र्यात कडाडले!

शाखा तोडली, बॅनर फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडू; उद्धव ठाकरे मुंब्र्यात कडाडले!

ठाणे-

मुंब्र्यात शिवसेनेची शाखा पाडण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटातील वातावरण तापलेलं असताना आज उद्धव ठाकरे थेट मुंब्र्यात पोहोचले. शाखेच्या जागेची पाहणी केल्यानंतर ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर तोफ डागली. "तु्म्ही शाखा पाडली, आमचे बॅनर फाडले. पण आता यापुढे कोणतीही निवडणूक असू द्या, तुमची मस्ती आम्ही फाडू आणि डिपॉझिट जप्त करू", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, अनिल देसाई, राजन विचारे आणि ठाकरे गटाचे इतर नेतेही उपस्थित होते. मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेची कागदपत्रं आमच्याकडे आहेत असंही ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं. 

"तुम्ही मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारले आहेत. आता मधमाशा कुठे डसतील ते बघा. मुंब्र्याच्या शाखेची कागदपत्र आमच्याकडे आहेत. गद्दारांचं डिपॉझिट जप्त करुन त्यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे. तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि या", असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. इथल्या शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला असता तर महाराष्ट्राने यांचे केस उपटून टाकले असते, असंही ठाकरे म्हणाले. 

गद्दार काही दिवसांचे पाहुणे
"पोलिसांना हाताशी धरुन काय अंगावर येता. तुम्ही दिल्लीश्वरांच्या आदेशावर नाचणारे बाहुले झाले आहेत. हिंमत असेल तर पोलिसांना बाजुला करा आणि भीडा. गद्दार काही दिवसांचे पाहुणे आहेत. हातातली सत्ता गेली तर मग कुठे फिराल? शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला तर हा महाराष्ट्र तुमचे केस उपटून काढेल. सरकार आपल्या दारी बॅनर लागलेत. पण हे तुमच्या दारावर आले तर तुम्ही यांना भिक घालाल का? आता कोणतीही निवडणूक असू देत या गद्दारांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे असा निश्चय करा", असं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray attacks on cm shinde in Mumbra speech